माण-खटाव विधानसभा: जनसंवाद दौऱ्यात सौ. सोनिया गोरे यांचा विकासकामांच्या पाहणी दौरा संपन्न
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड (प्रतिनिधी):
माण तालुक्यात सोमवारी, 14 ऑक्टोबर 2024 रोजी जनसंवाद दौऱ्याच्या माध्यमातून आमदार जयकुमार गोरे (भाऊ) यांच्या पत्नी आणि श्री सिद्धनाथ संस्थेच्या संचालिका, सौ. सोनिया गोरे यांनी मलवडी, सत्रेवाडी, शिंदी गाडेवाडी आदी गावांना सदिच्छा भेट दिली. या दौऱ्यात त्यांनी नागरिकांशी संवाद साधून, त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि विविध विकासकामांची पाहणी केली.
गावांमध्ये आमदार जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली विकासनिधीतून झालेल्या पायाभूत सुविधांचा आढावा घेतला. त्यांनी शिक्षण, आरोग्य, रस्ते, वीज, महिला सक्षमीकरण यासारख्या क्षेत्रांत झालेल्या प्रगतीचे निरीक्षण केले. गावकऱ्यांनी त्यांचे प्रेम आणि आपुलकीने स्वागत करत, या विकास कामांबद्दल समाधान व्यक्त केले.


