शहीद जवान नायब सुबेदार शंकर बसाप्पा उकलीकर यांची वीर माता व वीर पत्नी यांचा सैनिक फेडरेशन कडून सन्मान: प्रशांत कदम (माजी सैनिक)

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
कुलदीप मोहिते कराड

शहीद जवान नायब सुभेदार शंकर बसाप्पा उखळीकर यांची वीर माता वीर पत्नी यांचा रविवारी सैनिक फेडरेशन सातारा यांच्याकडून सन्मान करण्यात आला

शहीद जवान शंकर बसाप्पा उकलीकर दि.१३/१०/२०२४ रोजी प्रथम पुण्य स्मरण अभिवादन सोहळा त्यांचे जन्म गावी कराड तालुक्यातील वसंतगड येथे संपन्न झाला.भारतीय सेनेतील बॉम्बे इंजिनीयर ग्रुप मधील 112 इंजिनीयर रेजिमेंटमध्ये जम्मू कश्मीर येथे कार्यरत असताना शहीद जवान शंकर बसाप्पा उखळीकर यांना वीर मरण आले. त्यांच्या शौर्याला त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी त्यांचे प्रथम पुण्यस्मरण अभिवादन सोहळा त्यांच्या जन्म गावी पार पडला यावेळी सातारा जिल्हा सैनिक फेडरेशनचे वतीने वीर माता व वीर पत्नी यांना शाल व सन्मान चिन्ह ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी प्रशांत कदम अध्यक्ष सातारा जिल्हा सैनिक फेडरेशन, सदाशिव नागने अध्यक्ष कराड तालुका सैनिक फेडरेशन,. तनाजी सुर्वे (नि.सुबेदार)अध्यक्ष आजी/माजी सैनिक संघटना अभयचीवाडी,. मनोज शिंदे (माजी सैनिक) व सेवारत सैनिक सुबेदार देसाई साहेब 112 इंजिनीयर रेजिमेंट व सर्व सेवारत सैनिक , माजी सैनिक,त्यांचे कुटुंबीय, शहीद जवान कुटुंबीय, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होत.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!