डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या पाठपुराव्याला यश – पत्रकार महामंडळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )

 

मुंबई: डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या सततच्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकारांसाठी महामंडळ स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला. या निर्णयामुळे राज्यातील पत्रकारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी या यशस्वी पाठपुराव्याबद्दल समाधान व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे आभार मानले आहेत. त्यांनी सांगितले की, महाबळेश्वर येथे आयोजित ऐतिहासिक अधिवेशनात मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेला शब्द आणि कोल्हापुरातील कनेरीमठ अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता झाली आहे.

राज्यातील पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य सतत प्रयत्नशील होते. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख, मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी, तसेच मुख्यमंत्र्यांचे माध्यम सल्लागार विनायक पात्रुडकर यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे पत्रकारांच्या हितासाठी जोरदार पाठपुरावा केला.

या निर्णयामुळे पत्रकारांच्या कल्याणासाठी नवी दिशा मिळेल, अशी भावना राज्यभरातील पत्रकारांमध्ये व्यक्त होत आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!