एसटी स्टँडवरील अतिक्रमण आणि अपूर्ण गटार कामांमुळे नागरिक त्रस्त, अजिनाथ केवटे यांचे आमरण उपोषणाची सुरु
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड
म्हसवड नगरपरिषद हद्दीतील एसटी स्टॅंड परिसरातील फळ विक्रेत्यांचे अतिक्रमण आणि चांदणी चौक ते शिक्षक कॉलनीपर्यंत अपूर्ण गटार कामांमुळे वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या समस्या सोडविण्यासाठी वेळोवेळी लेखी तक्रारी करूनही प्रशासनाकडून योग्य पावले न उचलल्याने अजिनाथ लक्ष्मण केवटे यांनी बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा दिला होता .आज उपोषणाचा तिसरा दिवस असून प्रशासनाने त्याची अद्याप कसलीही दखल घेतलेली नाही


