व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड :प्रतिनिधी
म्हसवड शहरातील सिद्धनाथ हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या सहावीतील विद्यार्थ्यांनी पोस्ट ऑफिसला भेट दिली. या भेटीत त्यांनी पोस्टाचे कामकाज कसे चालते याची सविस्तर माहिती घेतली. विद्यार्थ्यांना पोस्टल असिस्टंट अमित शर्मा यांनी पोस्ट ऑफिसची स्थापना कधी झाली, तसेच पोस्टाचा इतिहास याबाबत माहिती दिली.
सब पोस्ट मास्तर संतोष ढेंबरे यांनी विद्यार्थ्यांना स्पीड पोस्ट, रजिस्टर, मनी ऑर्डर, आणि पोस्टामध्ये असलेल्या विविध बचत योजनांविषयी सखोल मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे तिकिटांचे वेगवेगळे प्रकार आणि त्यांचा उपयोग यावरही माहिती दिली.
पोस्टमन सुनील भागवत आणि मयूर शेंडगे यांनी आलेल्या पत्रे, पार्सल, आणि मनीऑर्डर कसे वाटप केले जाते याविषयी सांगितले. विद्यार्थ्यांनी या भेटीमुळे पोस्ट ऑफिसच्या कामकाजाची जवळून माहिती मिळवली. या शैक्षणिक भेटीबद्दल प्राचार्य प्रवीण दासरे व प्रविण भोतेसर यांनी पोस्ट ऑफिसच्या सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
ही भेट विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त ठरली, ज्यामुळे त्यांना पोस्ट ऑफिसच्या कामकाजाचे प्रत्यक्ष ज्ञान मिळाले.