पदवीधरांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत : शैलेश मोहिते

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )

कुलदीप मोहिते उंब्रज कराड

उंब्रज ता कराड येथील साई मेडिकल फाउंडेशन अँड चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र यांचा 6 / 10 /2024 रोजी सतरावा वर्धापन दिन उत्साहात संपन्न झाला

उंब्रज-येथील साई मेडिकल फाऊंडेशन & चॅरिटेबल ट्रस्ट ची स्थापना दि.06/10/2007 रोजी, शैलेश मोहिते यांनी समाजाचे काही देणं लागतो या उदात्त हेतुने खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करून करण्यात आली, होती गेली सतरा वर्षे ट्रस्टच्या माध्यमातून व विशेषतः शिक्षण व आरोग्य क्षेत्रात भरीव योगदान ट्रस्टमार्फत दिले व देत आहोत,

    मोफत सर्वरोग तपासणी शिबिर,रक्तदान शिबिर,मोफत नेत्र व मोतीबिंदू तपासणी व मोफत चष्मे व गरजुंना मोफत औषधे वाटप,HIV/AIDS निर्मुलन,National Nutritional Mission, वृषारोपण,लेक वाचवा अभियान व गुणवंतांचा सत्कार ,जेष्ठ नागरिकांचा सत्कार ,विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप,Covid कालावधीत मास्क,सॅनिटायझर,औषधे वाटप असे अनेक सामाजिक उपक्रम ट्रस्टमार्फत राबवण्यात आले आहेत

तसेच जागतिक किर्तीचे कॅन्सर तज्ञ डाॅ. उन्मेष मोहिते यांच्या माध्यमातून रूग्णांना कॅन्सर,ब्लड कॅन्सर,रक्ताचे विविध आजार या संदर्भात मोफत सल्ला व मार्गदर्शन व जागतिक किर्तीच्या नवजात-शिशु बालरोग तज्ञ डाॅ.श्वेता उन्मेष मोहिते यांच्या माध्यमातून ही मोफत मार्गदर्शन करण्यात आल्याची माहिती ही अध्यक्ष शैलेश मोहिते यांनी दिली

KG to PG साठी विद्द्यार्थ्यांनां शैक्षणिक मार्गदर्शन त्याच्या माध्यमातून होत आहे अनेक तरुण तरुणींना नामांकित इंजिनिअरिंग व फार्मसी व इतर काॅलेजेसना प्रवेश मिळवून देण्यात आले आहेत, तसेच अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नामांकित इंजिनिअरिंग व औषध निर्माण कंपनीत रोजगार उपलब्ध करून देण्यात आले आहेत, तसेच पदविधरांच्या समस्या सोडवण्यासाठी कटीबद्ध आहोत अशी माहिती वर्धापनदिनी देण्यात आली ,

यावेळी उपस्थित.रणजित आप्पा पाटील,संचालक डॉ.सुनील कोडगुले,अभिजीत काळे,प्रणील पाटील, दिलीप आगाशे,आनंदराव पवार,डाॅ.संजय यादव,जगन्नाथ थोरात,बाबुराव नागुरे व इतर उपस्थित होते,ट्रस्टच्या उपक्रमास खासदार शरद पवार साहेब, खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार डॉ.अमोल कोल्हे, प्रदेशाध्यक्ष आमदार .जयंत पाटील,मा.खासदार श्रीनिवास पाटील,आमदार बाळासाहेब पाटील ,तसेच विविध राजकीय पदाधिकारी,तसेच शासकीय प्रशासकीय अधिकारी व समाजातील विविध स्तरातील व्यक्ती व संस्थांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!