म्हसवड येथे हिंदु बहुजन सन्मान यात्रा: बहुजन समाजाच्या सन्मानासाठी उपस्थित राहण्याचे करणभैय्या पोरे यांचे आवाहन
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड:प्रतिनिधी
हिंदु बहुजन सन्मान यात्रा म्हसवड येथे रविवार दि ०६/१०/२४ रोजी दुपारी दोन वाजता येत असून, या यात्रेच्या निमित्ताने बहुजन समाजाच्या हक्क, अधिकार आणि सन्मानासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करणभैय्या पोरे यांनी केले आहे. या यात्रेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. आमदार योगेशअण्णा टिळेकर उपस्थित राहणार आहेत, ज्यांच्या नेतृत्वाखाली या यात्रा बहुजन समाजाच्या सन्मानाला उजाळा देण्यासाठी होणार आहे.


