नाडे येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
पाटण: प्रतिनिधी
श्रीकांत जाधव
नाडे-नवारस्ता:
पाटण तालुक्यातील नाडे ग्रामपंचायतीच्या आवारात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तालुक्यातील पहिल्या अश्वारुढ पुतळ्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

या अश्वारुढ पुतळ्याची उंची ९ फूट असून हा पुतळा लोकवर्गणीतून उभारण्यात आला आहे. गेट वे ऑफ इंडिया, मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची प्रतिकृती नाडे येथे उभारण्यात आली आहे. पाटण तालुक्यातील हा पहिला अश्वारुढ पुतळा आहे, ही अभिमानाची बाब असल्याचे पालकमंत्री मा.ना.शंभूराज देसाई साहेब म्हणाले.


