शेतकरी इंजि. सुनील पोरे यांचा बोयोसीड कंपनीकडून सन्मान
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड (प्रतिनिधी):
शेती क्षेत्रात नवनवीन प्रयोग आणि प्रगतीचे उत्कृष्ट उदाहरण सादर करणारे शेतकरी इंजि. सुनील पोरे यांना बोयोसीड कंपनीकडून विशेष सन्मान करण्यात आला आहे. त्यांनी बोयोसीड कंपनीचे बाजरा ३६६ वाण लावून भरघोस उत्पन्न मिळवले आहे. या यशस्वी प्रयोगामुळे कंपनीच्या टेरिटोरी मॅनेजर यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.
उत्कृष्ट उत्पादनाची कथा बाजरा ३६६ हे वाण अत्यंत प्रतिकूल हवामानातही चांगले उत्पादन देते. सुनील पोरे यांनी कमी खर्चात आणि कमी कालावधीत उच्च गुणवत्तेचे उत्पन्न घेतले आहे. त्यांच्या या प्रयोगामुळे इतर शेतकऱ्यांनाही प्रेरणा मिळेल, असा विश्वास बोयोसीड कंपनीने व्यक्त केला आहे.


