जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा विरकरवाडीची जिल्हास्तरीय तपासणी यशस्वी, शाळेच्या व्यवस्थापनाचे कौतुक

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )

म्हसवड : प्रतिनिधी
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन या अभियानांतर्गत, सातारा जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा विरकरवाडी, तालुका माण, या शाळेची जिल्हास्तरीय तपासणी करण्यात आली. शाळेतील भौतिक सुविधा, पायाभूत सुविधा, गुणवत्ता आणि लोकसहभाग या तीन महत्त्वाच्या निकषांवर ही तपासणी करण्यात आली.

सातारा जिल्हा परिषदेचे योजना शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी, फलटण डायटचे अधिव्याख्याता सतीश फरांदे, शिक्षण विस्तार अधिकारी संजीवनी मुळे, दैवता साळुंखे यांनी या शाळेची तपासणी केली. यावेळी गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे आणि केंद्रप्रमुख दीपक पतंगेही उपस्थित होते.

शालेय रेकॉर्ड, परसबाग, विज्ञान कक्ष, संगणक कक्ष, स्पोर्ट्स रूम, हँड वॉश स्टेशन, स्वच्छतागृह, गांडूळ खत निर्मिती, बालोद्यान यासारख्या विविध सुविधांची पाहणी करून शाळेची गुणवत्ता तपासण्यात आली. शाळेतील भौतिक सुविधा समाधानकारक असल्यामुळे शाळा व्यवस्थापन, शाळा समिती व शिक्षकांचे कौतुक करण्यात आले.

शाळेच्या गुणवत्तेचा विकास तपासणी दरम्यान महत्त्वाच्या मुद्द्यांवर आधारित करण्यात आला. शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्ष विशाल विरकर, माजी नगरसेवक सोपान वीरकर, मुख्याध्यापक अनिता तोरणे आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत तपासणी संपन्न झाली. शाळेच्या यशस्वी कामगिरीबद्दल जिल्हा स्तरावरून समाधान व्यक्त करण्यात आले.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!