अभयदादा दहीहंडी चषक पंदारेच्या संघाकडे म्हसवडमध्ये प्रतिसाद; नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )

म्हसवड

अभयदादा युवा शक्ती व व्यापारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) युवक प्रदेश सरचिटणीस अभयसिंह जगताप यांच्या नेतृत्वाखाली ‘अभयदादा चषक दहीहंडी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. म्हसवडच्या बाजार पटांगणात झालेल्या या कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाच्या मुख्य आकर्षणात पंदारे (बारामती) येथील भीमराव वाघमारे दहीहंडी संघाने पहिल्या प्रयत्नातच उंच बांधलेल्या दहीहंडीचा फोड करत ‘अभयदादा दहीहंडी चषक’ आपल्याकडे खेचला. या विजयानंतर पंदारेच्या संघाने मोठा जल्लोष साजरा केला.

द्वितीय क्रमांकासाठी गुणवरे (ता. फलटण) येथील काळभैरव दहीहंडी संघाने आपली उत्कृष्ट कामगिरी दाखवली. या संघासही विशेष गौरवाने सन्मानित करण्यात आले. विजेत्या व द्वितीय क्रमांकाच्या संघांना रोख रक्कम व चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

मान्यवरांची उपस्थिती:
या सोहळ्यास महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, आटपाडीचे नेते तानाजी पाटील, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, इंदापूर येथील राष्ट्रवादी युवकचे गणेश बांडोरे, माजी नगराध्यक्ष विलास माने, दहिवडी नगरपंचायत बांधकाम समितीचे सभापती महेश जाधव, आरपीआय तालुकाध्यक्ष सनी खरात, युवक अध्यक्ष सचिन माने, माजी उपनगराध्यक्ष कुमार सरतापे, अभय वाघमारे, रवी सराटे तसेच आयोजक अभयसिंह जगताप आणि व्यापारी संघटनेचे परेश व्होरा हे प्रमुख पाहुणे होते.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अभयदादा युवा शक्तीचे ऋषिकेश जगताप, बाबू सरतापे, परेश व्होरा, पिंटू लिंगे, करण जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.

सांस्कृतिक रंगत:
कार्यक्रमाची सुरुवात मराठमोळ्या लावणीने झाली. नृत्यांगना सायली पाटील यांच्या ठसकेबाज लावणी नृत्याने वातावरणाला रंगत आणली. त्यांच्या सोबत इतर नृत्यांगणांनी देखील मराठी गाण्यांवर दमदार सादरीकरण केले, ज्याला उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला. कार्यक्रमात महिलांची विशेष उपस्थिती होती, जी विशेषतः लावणी कार्यक्रमाच्या वेळेस लक्षवेधी ठरली.

नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग:
दहीहंडी उत्सव म्हटल्यावर जनतेच्या उत्साहाला उधाण येते, तसेच या कार्यक्रमातही मोठ्या प्रमाणात लोकांनी सहभाग घेतला. बाजार पटांगणात झालेल्या या कार्यक्रमास म्हसवडसह आसपासच्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने हजर होते. गोविंदा पथकांच्या रोमांचक सादरीकरणाला नागरिकांनी मोठ्या उत्साहाने दाद दिली


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!