माणगंगा शैक्षणिक संकुल मासाळवाडी, म्हसवडमध्ये नवीन नियुक्त्या
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड
माणगंगा शैक्षणिक संकुल, मासाळवाडी, म्हसवड येथे काही महत्त्वाच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. संस्थेच्या मॅनेजिंग डायरेक्टर पदावर श्री. रावसाहेब नारायण मासाळ सर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, माणगंगा इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्रिन्सिपॉल म्हणून सौ. दिपाली बनसोडे (MA, Med English) यांची निवड झाली आहे.

उपमुख्याध्यापक पदावर सौ. सुवर्णा राजमाने यांची नियुक्ती करण्यात आली असून, परिवेक्षक म्हणून श्री. भगवान सजगाणे सर आणि लिपिक पदावर मिस. मानसी चोपडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. वसंत मासाळ, सचिव श्री. नारायण मासाळ, उपाध्यक्ष श्री. सुखदेव मासाळ, संचालक सौ. सविता मासाळ, संचालक श्रीमती सुनीता ठोंबरे यांच्यासह सर्व संचालक मंडळ, माजी मुख्याध्यापक सौ. ढेंबरे मॅडम आणि सर्व शिक्षक व कर्मचारी वर्गाने नवीन नियुक्त झालेल्यांचे अभिनंदन केले आहे.


