राज्यस्तरीय आट्यापाट्या स्पर्धेसाठी क्रांतिवीर शाळा संघाची निवड.

बातमी Share करा:

 म्हसवड – (अहमद मुल्ला )
    दहिवडी येथे झालेल्या मुलींच्या विभागीय आट्यापाट्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्याने क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळा संघाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
     दहिवडी तालुका माण येथे 14 वर्षे वयोगटा खालील मुलींच्या विभागीय स्तरावरील आट्यापाट्या स्पर्धा नुकत्या संपन्न झाल्या.यामध्ये विभागा अंतर्गतचे विविध जिल्ह्यातील आठ संघ सहभागी झाले होते. विभागीयआट्यापाट्या स्पर्धेत क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळेतील मुलीच्या संघाने प्रथम क्रमांक मिळविला.राज्यस्तरीय आट्यापाट्या स्पर्धा उस्मानाबाद येथे होणार आहेत.या संघात रोशनी माने,पल्लवी पोळ,वैष्णवी पिसे,दर्शनी लोखंडे,रिया लोखंडे,शिवानी ढगे,मोनाली माने,स्वरांजली ढोले,सुहानी लोखंडे, तनिष्का खाडे, आरजू मुलानी,वैष्णवी डमकले,ऋतुजा मंगरुळे,यांचा समावेश आहे.
    या संघाला क्रीडा शिक्षक तुकाराम घाडगे व चंद्रकांत तोरणे यांनी मार्गदर्शन केले.संस्था अध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर,संस्था सचिव मुख्याध्यापिका सुलोचना बाबर,माण तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी माणिक राऊत,शिक्षण विस्तार अधिकारी लक्ष्मण पिसे,केंद्रप्रमुख बाळासाहेब पवार,महात्मा गांधी विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे दहिवडीचे प्राचार्य बबनराव खाडे, व क्रीडा शिक्षक ज्ञानेश्वर काळे ,राज्य क्रीडा मार्गदर्शक दत्ता माने,क्रांतिवीर संकुलातील शिक्षक पालक यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!