महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा जिल्ह्यातील सैनिकांच्या समस्यासाठी दिली भेटीची वेळ

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )

कुलदीप मोहिते सातारा

      रविवार दि.18/8/2024 रोजी सातारा जिल्हा शासकीय विश्रामगृह या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांची सातारा जिल्ह्यातील माजी सैनिक श्री प्रशांत कदम अध्यक्ष सैनिक फेडरेशन सातारा जिल्हा व माजी सैनिक व शहीद जवान कुटुंबीयांनी समस्या विषयी घेतली भेट

       या भेटीदरम्यान दि.30/8/2024 रोजी “सैनिक आक्रोश मोर्चा”सैनिक व त्यांच्या कुटुंबियांच्या विविध समस्यासाठी काढणार आहोत असे अवगत करण्यात आले. व सैनिकांच्या असणाऱ्या सविस्तर समस्या अडचणी विषयी चर्चा करण्यात आली व निवेदन देऊन अवगत करण्यात आले .

      मुख्यमंत्री यांनी आश्वासित केले. व त्यांनी सांगितले की आपण माजी सैनिकांनी “सैनिक आक्रोश मोर्चा” काढू नये आम्ही सैनिक व त्यांचे कुटुंबीय शहीद जवान कुटुंबिय यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहोत.लवकरच सातारा जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक संघटना अध्यक्ष व माजी सैनिक यांची मीटिंग लवकरच बोलवण्यात येईल व भेटीची वेळ देण्याचे कबूल केले आहे व त्यांनी आपल्या पी . ए. यांना बोलावून सांगितले आहे त्यामुळे “सैनिक आक्रोश मोर्चा*स्थगित करण्यात आला आहे

       या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. शंभूराज देसाई सैनिक कल्याण अधिकारी (नि.) शिवाजी पवार साहेब, कराड तालुका सैनिक फेडरेशन अध्यक्ष सदाशिव नागणे, पाटण तालुका सैनिक फेडरेशन संतोष यादव, शहीद जवान वीर पुत्र सूरज जगताप उपस्थित होते


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!