सामजिक सेवेतून शैक्षणीक मदत ह्या उपक्रमाअंतर्गत म्हसळा तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेनेचे प्रमुख,दानशूर समाजसेवक कौस्तुभ करडे यांच्या प्रयत्नाने म्हसळा गवळवाडी येथील इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले.
या उपक्रमातून गोर गरीबांचे मुलांना छोटीशी मदत होते आणि विद्यार्थी दशेत असतानाच मुलामुलींना समाजसेवे बरोबरच भविष्यात दुसऱ्यांना मदत करण्याची आवड निर्माण व्हावी अशा स्तुत्य हेतुने हा उपक्रम करण्यात येत असल्याचे युवा सेना प्रमुख यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.
श्री विठ्ल रखुमाई मंदिर सभागृह गवळवाडी येथे शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाला शहर अध्यक्ष दिपल शिर्के,नितीन दर्गे,राहुल काते,शाखा प्रमुख अंकुश नटे,युवा सैनिक स्वानंद उर्फ भाई बोरकर,श्रेयस चोगले उपस्थित होते.