तालुक्यातील गोर गरीब घटकातील नागरीकांना सुलभ व मोफत आरोग्य सेवा मिळावी या उद्देशाने खासदार सुनिल तटकरे यांनी म्हसळा नाका,एस.टी.स्थानक शेजारीच २०१४ मध्ये शासन दरबारी साडे तीन कोटी रुपये खर्चाचे ३० खाटाचे सुसज्य ग्रामीण रूग्णालय उभारले आहे.ईमारत ऊभी राहिले पासुन या रूग्णालयात खासदार सुनिल तटकरे,मंत्री आदिती तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांच्या प्रयत्नाने रुग्णांना आरोग्य सुविधांचा दर्जेदार लाभ मिळावा यासाठी यशस्वी प्रयत्न सुरु ठेवले आहेत.
दररोज १०० ते १२५ ओपीडी आसलेल्या म्हसळा ग्रामीण रुग्णालयात सुविधांचा पाऊस पडत असताना ना.आदीती तटकरे यांनी अद्ययावत प्रसुती कक्ष सुरू करून दिले आहे. नव्याने महीला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी ग्रामीण भागातील गरीब रुग्णांना अचुक उपचारासाठी सोनोग्राफी सेंटर उभारून आवश्यक सोनोग्राफी मशीनचे लोकार्पण केले.
वैद्यकिय अधिकारी डॉ.महेश मेहता यांनी आयोजीत केलेल्या स्वागत कार्यक्रमाला प्रास्तविक केले आणि रूग्णालयात देण्यात येणाऱ्या सेवा आणि आवश्यक सुविधांची गरज याची सविस्तर माहिती दिली.यावेळीना.आदिती तटकरे यांनी मनोगत व्यक्त करताना टप्प्याटप्याने म्हसळा ग्रामीण रुग्णालयात आरोग्य सुविधांची पूर्तता करू.काही दिवसातच येथे डायल्यासिस सेंटर उभारून येथील रूग्णांना होणारा त्रास कमी करू असे आश्र्वासन दिले.रुग्णालयात वैद्यकिय अधिकारी,कर्मचारी,अधीपरीचारिका यांनी केलेल्या रुग्ण सेवेचे कौतुक केले.येत्या १३ ऑगस्ट २०२४ रोजी आरोग्य शिबीर घेण्यात येणार असल्याचे घोषीत केले.तालुक्यातील रूग्णांनी आरोग्य निदान करण्यासाठी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
मागील दोन वर्षापासून रूग्णालयात अधीपरीचरिका म्हणुन कार्यरत असलेल्या सायली केळसकर आणि सिध्दकला काते यांची अलिबाग येथे मेडिकल हॉस्पीटल मध्ये शासन नियुक्ती झाल्याने त्यांचे मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.सोनोग्राफी कक्षाचे उद्घाटन कार्यक्रमाला मंत्री आदिती तटकरे यांच्या समावेत श्रीवर्धन उपविभागीय अधिकारी महेश पाटील,तहसीलदार समिर घारे,गट विकास अधिकारी माधव जाधव,वैद्यकीय अधिक्षक डॉ.महेश मेहता,मुख्याधिकारी विठ्ठल राठोड,स.पो.नि.संतोष आवटी,ता.वैद्यकीय अधिकारी,डॉ.बिराजदार,तालुका अध्यक्ष समीर बनकर,जिल्हा चिटणीस महादेव पाटील,डॉ.सोनाली करंबे,उपनगराध्यक्ष संजय दिवेकर,महीला अध्यक्षा मिना टिंगरे,शहर अध्यक्षा शगुप्ता जहांगिर,माजी महीला अध्यक्षा रेश्मा काणसे, वृषाली घोसाळकर,भाजप महिला प्रमुख रेखा धारिया,भाजप ता.अध्यक्ष तुकाराम पाटील,सेना तालुका प्रमुख प्रसाद बोर्ले,निलेश मांदाडकर,माजी सभापती संदिप चाचले,माजी नगराध्यक्ष सुनिल शेडगे,भाई बोरकर,प्रकाश गाणेकर,संतोष नाना सावंत,अनिल बसवत,महेश घोले,रफिक घरटकर,वृषाली घोसाळकर,नईम दळवी,नगरसेवक जंजीरकर, सरोज म्हशिलकर,नौसिन दळवी,चोगले, आमदनी,किरण पालांडे, शेखर खोत,सरपंच वनिता खोत,संदीप पाटील, गजानन जंगम,गजानन पाखड,नवाब कौचाली आदी मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.