म्हसवड गत पंधरा दिवसापासून दररोजच सर्वरचा प्रॉब्लेम असून यामुळे रेशन कार्डधारक व दुकानदार यांच्यामध्ये वादावादी होत असल्याने माण तालुक्यातील 139 स्वस्त धान्य दुकानदारांनी जोपर्यंत सर्वर प्रॉब्लेम सुटत नाही तोपर्यंत आपल्या ई पॉश मशीन तहसील कार्यालयात जमा करण्यात आल्या असून शासनाने दुकानदाराच्या विविध मागण्यांचा तातडीने निर्णय घेऊन न्याय द्यावा अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष भगवानराव गोरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनामध्ये पुढे म्हटले आहे की गत पंधरा दिवसापासून सर्वर समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवली आहे तसेच मशीनला रेंज येत नाही नेटवर्कमध्ये अनेक अडचणी येत आहेत यामुळे धान्यवाटप पूर्णतः बंद पडलेले आहे ग्राहक दाण्यासाठी दररोज दुकानांमध्ये हेलपाटे मारत आहेत माण तालुका हा कायम दुष्काळी तालुका असल्यामुळे रेशनिंग धान्य दुकान हेच लोकांच्या उपजीविकेचे साधन बनले असून या सर्व प्रॉब्लेम मुळे ग्राहक व दुकानदार यांच्यामध्ये वादावादीचे प्रसंग घडत आहेत
नेटवर्क व्यवस्थित नसल्याने पोस्ट मशीन बंद आहेत ग्राहकांना धान्य वितरण वेळेत करणे दुकानदारांना शक्य होत नसल्यामुळे 5 ऑगस्ट रोजी सर्व दुकानदार बंधू भगिनी यांनी माण तहसील कार्यालयामध्ये बैठक घेऊन 139 ई पॉश मशीन बॉक्समध्ये भरून बॉक्स सेल करून तहसील कार्यालयात जमा करण्यात आलेल्या आहेत सर्वर नेटवर्क समस्येमुळे माहे जुलै 2024 चे धान्य वाटप अनेक दुकानदारांचे जवळजवळ 60 ते 70 टक्के ग्राहकांना वाटप करण्याचे राहिलेले आहे याकरिता जुलै 2024 चे धान्य वाटपाची मुदत संपूर्ण ऑगस्ट 2024 पर्यंत वाढवून मिळावी जुलै व ऑगस्ट 2024 चे धान्य वाटप एकाच पावतीवर म्हणजे गहू तांदूळ आनंदाचा शिधा साखर इत्यादी एकच अंगठा घेऊन पावती निघावी तसेच गोडाऊन मधून थेट वाहतुकीद्वारे दुकानदारांना येणारी धान्याची पोती ही फाटकी येतात त्यामुळे वाहतुकीच्या वाहनांमध्ये फाटक्या पोत्यातून मोठ्या प्रमाणात धान्य सांडते फाटकी पोती जागेवरूनच शिवून मिळावीत ग्राहकांना धान्य देते वेळेस सांडलवंड होते त्यामुळे दुकानदारांना धान्याचे प्रत्येक पन्नास किलोच्या पोत्यामागे 500 ग्रॅम तुट घालण्यास परवानगी मिळावी पूर्वी शंभर किलो धान्याच्या पोत्यात एक किलो तूट घालण्याची परवानगी होती सध्या तशी तूट घालू दिली जात नाही तरी पूर्वीप्रमाणे तूट घालण्यास मंजुरी मिळावी प्रत्येक कार्डधारकांची ई केवायसी नोंदी करण्याचे काम दुकानदारांना सांगण्यात आलेले आहे तरी एका कार्डसाठी पन्नास रुपये मेहताना मिळावा आधी विविध मागण्या शासनाने तात्काळ सुरू कराव्यात तसेच सर्वर प्रॉब्लेम तातडीने सोडवावा व स्वस्त धान्य दुकानदार व ग्राहक यांच्यातील वादावादी थांबवावी अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली असून सदर निवेदनावर भगवानराव गोरे राजकुमार सूर्यवंशी वसंतराव भोसले दादासाहेब काळे व सर्व स्वस्त धान्य दुकानदार यांच्या सह्या आहेत