म्हसवड – म्हसवड नगरपालिकेसाठी विविध विकासकामांसाठी केंद्र सरकारच्या योजनांसाठी पाठपुरावा करुन पालिका क्षेत्रातील नागरीकांच्या समस्या सोडणार असून म्हसवडकर जनतेने माझ्या वर जो विश्वास दाखवला त्याला तडा जाऊ देणार नाही असे वक्तव्य माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केले.
ते शहराच्या पालिकेचा विस्कळीत पाणी प्रश्न व इतर पालिका हद्दीतील नागरीकांच्या कामाच्या अडी अडचणी संदर्भात खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची आढावा बैठक म्हसवड नगरपालिका सभागृहात पार पडली यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील,राष्ट्रवादी चे नेते प्रभाकर देशमुख, माजी नगराध्यक्ष विलासराव माने,मुख्याधिकारी डॉ सचिन माने राष्ट्रवादी कॉ जिल्हा उपाध्यक्ष किशोर सोनवणे, जय राजेमाने, रा. कॉ.चे विश्वंभर बाबर, पालिकेतील विविध विभागांचे कर्मचारी आदी मान्यवर उपस्थितीत होते यावेळी बोलताना खा.मोहिते पाटील म्हणाले राजकारण फक्त निवडणुकी पुरते असते निवडणुका संपल्याकी राजकारण वरहित सर्व सामान्य जनतेचे काम करणे आपले कर्तव्य आहे या ठिकाणी प्रत्येकाच्या समस्या सोडवणे माझे काम आहे नगरपालिकेसाठी केंद्राकडून मिळणाऱ्या ज्या योजना असतील त्या मिळवण्यासाठी मी आग्रही राहणार आहे त्याचप्रमाणे माणगंगा नदीत जिहे कंटापूर अथवा उरमोडीचे पाणी सोडण्याबाबत मागील महिन्यात पालकमंत्र्याकडे मागणी केली असून लवकरच ते पाणी माण नदीपात्रात येईल त्यामुळे म्हसवडकरांचा पिण्याच्या पाण्याचा व शेती पाण्याचा प्रश्न सोडवता येईल असे सांगितले या आढावा बैठकीत खा. मोहिते पाटील यांनीनवीन पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा आढावा घेऊन ते लवकर पूर्ण करण्यासाठी साठी प्रयत्न करण्या बाबत तसेच सध्या जुनी पाणी पुरवठा योजनेतून तीन चार दिवसातून पाणी पुरवठा कसा करता येईल या विषयी माहिती घेतली व सुचेना यावेळी केल्या. यावेळी अनेक नागरिकांनी आपल्या समस्या खासदारां पुढे मांडल्या त्यामध्ये पंधरा दिवसातून येणारे पिण्याचे पाणी, दूषित पाणीपुरवठा, बंद पडलेल्या स्ट्रीटलाईट, चांदणी चौक ते शिक्षक कॉलनी रस्ता दुरुस्ती, वाहतूक कोंडी,या समस्यांचे नीराकरण करण्यासाठी मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांना खा. धैर्यशील मोहिते – पाटील यांनी सूचना दिल्या.