लिंगायत समाजाच्या दफनभूमीबाबत न्याय मिळवण्यासाठी 15 ऑगस्ट रोजी नगरपालिकेच्या कार्यालयासमोर आत्मदहन: अजिनाथ केवटे

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड:
         म्हसवड येथील लिंगायत समाजाच्या दफनभूमी बाबत तेरा दिवस उपोषण करूनही म्हसवड नगर परिषदेने न्याय न दिल्यामुळे 15 ऑगस्ट रोजी नगरपालिकेच्या कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा अजिनाथ लक्ष्मण केवटे यांनी लेखी निवेदनाद्वारे दिला आहे
          म्हसवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनामध्ये पुढे म्हटले आहे की नगरपालिकेच्या हद्दीत लिंगायत समाजाची दपणभूमीची जागा भूमी क्रमांक 236 मध्ये 8 गुंठे आणि भू क्र 267 मध्ये 17 गुंठे एकूण 25 गुंठे जागा आहे.आपण मी दिलेल्या दिनांक 23 फेब्रुवारी 2024 व 13 जून 2024 च्या निवेदनानुसार आंदोलनाबाबत या जागेत कुठलाही ठोस निर्णय घेतलेला नाही ही जागा 31 जुलै 1998 रोजी तत्कालीन मुख्याधिकारी रुपेश चव्हाण यांच्या नावे बदली प्रस्ताव झालेला आहे तरीपण या जागेमध्ये दुसरा कोणी व्यक्तीने बेकायदेशीरपणे गाळे बांधलेले आहेत त्या जागेमध्ये ऊस हे पीक घेतले जात आहे आणि आपण या जागेत असलेल्या पत्र्याच्या गाळ्यांची नोंद करून वार्षिक घरपट्टी साडेअकरा हजार रुपये घेत आहात ही जागा आपल्या नावावर असताना आपण या जागेत पत्र्याच्या नऊ गाळ्यांची नोंद कशी काय केली? आपण माझ्या आंदोलनाबाबत कुठल्याही प्रकारचा अजून ठोस निर्णय घेत नसल्यामुळे तसेच आपल्या नगरपालिकेत असलेले इंजिनीयर देशमाने यांनी देखील मला उडवाउडवीची उत्तरे देऊन आंदोलनावर पडदा टाकण्याचे काम केलेले दिसून येत आहे
       नगरपालिका वाणी, तेली, कुंभार व जंगम या लिंगायत समाजाच्या दफनभूमीच्या संदर्भामध्ये सकारात्मक निर्णय घेण्याऐवजी राजकीय दबावाला बळी पडल्याचे दिसत आहे आपण शासकीय कामात कसूर करत आहात आणि न्यायदेवतेला व लोकशाहीला काळीमा फासत असल्याचे लक्षात आल्यामुळे आपण तातडीने लिंगायत समाजाच्या दफनभूमीचा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा 15 ऑगस्ट 2024 रोजी म्हसवड नगरपालिकेसमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे अजिनाथ केवटे यांनी दिला आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!