सर्वत्र प्रसिद्ध असलेला पाटण तालुक्यातील सडावाघापूरचा उलटा धबधबा सध्या पावसामुळे ओसंडून वाहू लागला आहे. हा उलटा धबधबा पाहण्यासाठी राज्यभरातील विविध जिल्ह्यातून मोठ्या संख्येने पर्यटक सडावाघापूरला दाखल होऊ लागले आहेत. दरम्यान या पर्यटकांमध्ये – हुल्लडबाजी करणाऱ्या व वाहतुकीची शिस्त न पाळणाऱ्या तरुणाईचा मोठा सहभाग आहे. उंब्रज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी API रविंद्र भोरे यांचे मार्गर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रमेश ठाणेकर , पोलीस हवालदार अमृत आळंदे, संजय धुमाळ, पोलीस नाईक थोरवे पोलीस कॉन्स्टेबल हेमंत पाटील , विशाल अवघडे, वरिष्ठ पलटन नायक प्रभारी अधिकारी अभिजीत पाटील विज खडके यांनी उंब्रज पोलीस ठाणे अंकित तारळे दूरक्षेत्र हद्दीत सडावाघापुर रोड बादवाट येथे नाकाबंदी करून 29 वाहनांवर मोटर वाहन कायद्यांतर्गत कारवाई करून 20400 रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. सडा वाघापूर येथे जाणाऱ्या सर्व पर्यटकांनी वाहतुकीचे नियम पाळून इतर पर्यटकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेणेबाबत उंब्रज पोलिसांकडून आवाहन करण्यात आलेले आहे