म्हसळा तालुका सेवानिवृत्त संघटनेची सभा संपन्न

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )

सुशील यादव

म्हसळा : प्रतिनिधी

       म्हसळा तालुका सेवानिवृत्त संघटनेची सभा शुक्रवार दि.१९-७-२०२४ रोजी तालुकाध्यक्ष प्रदीप सुतार यांच्या निवासस्थानी संपन्न झाली.
           सदर सभेत स्वागत व मृत सदस्यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर अभिनंदन ठराव घेण्यात आला.यानंतर मागील सभेचे इतिवृत्त वाचन सचिव अनंत येलवे यांनी करुन पूर्तता माहितीचा आढावा दिला.सदर सभेत सदस्यांच्या अडचणी समजावून घेऊन पूर्ततेसाठी उपाययोजना निश्चित करण्यात आली.

        या सभेत सदस्य वाढ व संघटनेसाठी मालकीची वास्तुव्यवस्था यावर भर देण्यात आला.याबाबतीत सुनील उमरोटकर, विलास यादव,स.भि.पवार ,ह.ल.मोहिते, दिलीप करंबे,नरेश विचारे ,सौ. करंबे व सौ. उमरोटकर तसेच बहुतांश सदस्यांनी सहभाग घेतला.
        अध्यक्ष श्री.सुतार व सौ. सुतार यांनी आपल्या मुलाच्या लग्नाप्रित्यर्थ सर्वांसाठी भोजन व्यवस्था उत्तम प्रकारे केली होती. सदर सभेची सांगता शुभाशीर्वाद अन् आभार यांनी गोडच झाली.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!