व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला ) विजयकुमार ढालपे गोंदवले :
गटेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांमध्ये मिळवलेले यश हे निश्चितपणे उल्लेखनीय असेच आहे असे गौरवोद्गार कराड पाटण तालुका प्राथमिक कराड पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटीचे संचालक श्री एम.डी. दडस सर यांनी काढले गुणवंतांचा सत्कार आणि शैक्षणिक साहित्य वाटप या कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर संतोष गोरड तसेच सरपंच उपसरपंच व विविध मान्यवर उपस्थित होते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गटेवाडी येथील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षा तसेच क्रीडा क्षेत्रामध्ये केलेल्या भरीव कामगिरीबद्दल विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मेडल व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला .यावेळी डॉ. संतोष गोरडे यांनी विद्यार्थ्यांनी यापुढेही अशीच कामगिरी उंचवावी असे सांगितले. तसेच सरपंच श्री भाऊ बनगर व माजी सरपंच श्री रमेश बावधाने यांनी शाळेत सर्वतोपरी सहकार्य करण्याचे जाहीर केले या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री संतोष घोडके उपशिक्षक श्री बाळासाहेब खाडे व श्री कालिदास जाधव यांचा मान्यवराच्या हस्ते सन्मान व सत्कार करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक श्री भास्कर खरात साहेब यांच्या वतीने विद्यार्थ्यांना लेखन साहित्याचे वाटप यावेळी करण्यात आले यावेळी उपसरपंच सुरेश जानकर व्यवस्थापन समिती अध्यक्ष आनंदा गोरड तानाजी गोरड आबाजी गोरड रघुनाथ विरकर तसेच अनेक पालक उपस्थित होते कालिदास जाधव यांनी आभार मानले