मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांच्या पूर्ततीसाठी कॅम्प लावण्यात यावे : नितीन दोशी

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड
       मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांच्या पूर्ततीसाठी कॅम्प आयोजित करणेबाबतची मागणी माजी नगराध्यक्ष नितीनशेठ दोशी यांनी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचेकडे केली आहे

       मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना दिलेल्या निवेदनात नितीन दोशी यांनो म्हटले आहे की
       सध्या महाराष्ट्रात सुरु असलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना’ हा अत्यंत स्तुत्य उपक्रम असुन यामुळे महाराष्ट्रातील असंख्य माता भगिनींना याचा लाभ घेता येणार आहे. परंतु या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रांसाठी उदा. उत्पन्न दाखले यासाठी महिलांची प्रचंड तारांबळ उडत आहे. तरी सदर दाखल्यांसाठी मा. तहसिलदार यांनी म्हसवड व माण तालुक्यातील इतर ठिकाणी कॅम्प आयोजित केला तर महिलांना कागदपत्रे सादर करण्यासाठी होणारा त्रास कमी होऊ शकतो. तसेच या कॅम्प मध्येच दाखले देण्याची व्यवस्था व्हावी यासाठी आपण तहसिलदार माण यांनी म्हसवड व तालुक्यात कॅम्प तात्काळ सुरु करण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती दोशी यांनी केली आहे 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!