दहिवडी पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा अंतर्गत ५ जणावर गुन्हा दाखल
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड
उसने दिलेल्या पैशाचे व्याजाचे पैसे देत नाही म्हणून जातीवाचक शिवीगाळ करून कुटूंबास जीवे ठार मारण्याची धमकी देऊन सुरज सुनील शीलवंत (वय 28) गोंदवले खुर्द ( शिलवंत वस्ती )यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले प्रकरणी ५ जणावर दहिवडी पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे
गुन्हयाची दहिवडी पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी मयत नामे सुरज सुनील शीलवंत वय 28 वर्ष जात हिंदू /महार राहणार गोंदवले खुर्द तालुका जिल्हा सातारा यास सुमारे 2 महिन्यापासून ते दिनांक 27/6/2024 रोजीचे सकाळी 10.30 वा दरम्यान वेळोवेळी आरोपी नामे 1) राम कट्टे 2) आशुतोष कट्टे तसेच आशुतोष चा भाऊ 3) आदर्श कट्टे 4) शिवतेज कट्टे सर्व राहणार गोंदवले बुद्रुक तालुका जिल्हा सातारा 5) संजय शेडगे राहणार गोंदवले खुर्द तालुका माण जिल्हा सातारा यांनी आपापसात संगणमत करून त्यांनी उसने दिलेल्या पैशाचे व्याज दिले असताना आणखी व्याजाची मागणी करून व ते व्याजाचे पैसे तो देत नाही या कारणा वरून वरील लोकांनी मयत सुरज सुनील शीलवंत यांचे घरी जाऊन त्यास तसेच त्याचे वडील सुनील जय जनार्दन शिलवंत यांना जाती वाचक बोलून त्यांना अपमानित करून त्यांना शिवीगाळ करून तसेच शीलवंत यास मारहाण करून त्याचे कुटुंबास जीवे ठार मारण्याची धमकी देऊन तसेच त्याचे राहते घरी गळफास लावून घेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले असल्याचे तपासात निष्पन्न आहे म्हणून माझी सरकार तर्फे1) राम कट्टे 2) आशुतोष कट्टे तसेच आशुतोष चा भाऊ 3) आदर्श कट्टे 4) शिवतेज कट्टे सर्व राहणार गोंदवले बुद्रुक तालुका जिल्हा सातारा 5) संजय शेडगे राहणार गोंदवले खुर्द तालुका मान जिल्हा सातारा यांचे विरुद्ध विठ्ठल दगडू विरकर, वय 48 वर्ष, पोलीस हेड कॉन्स्टेबल, बक्कल नंबर 255, दहिवडी पोलीस स्टेशन यांनी तक्रार दिली आहे
मा.श्रीमती शेंडगे सो उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी विभाग वडूज, स.पो.नी. अक्षय सोनवणे दहिवडी पोलीस ठाणे यांनी घटनास्थळी भेट दिली असून अधिक तपास सपोनि अक्षय सोनावणे करत आहेत