**म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतून हरवलेले दोन लाख किंमतीचे ११ मोबाईल हस्तगत करून मूळ मालकांना परत

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड

    म्हसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत हरवलेले आणि चोरीला गेलेले मोबाईल फोन परत मिळवण्याच्या यशस्वी कारवाईची माहिती नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

      म्हसवड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार यांनी मोबाईल शोध मोहिमेसाठी एक विशेष पथक तयार केले होते. या पथकातील पोलीस अंमलदारांनी सी.ई.आय.आर. पोर्टल आणि इतर तांत्रिक साधनांचा वापर करून हरवलेल्या मोबाईलचा शोध घेतला. या मोहिमेमुळे एकूण २,००,००० रुपये किंमतीचे ११ मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले.

     उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती अश्विनी शेंडगे यांच्या आदेशानुसार आज तक्रारदारांना त्यांच्या मोबाईल फोन परत करण्यात आले. प्रभारी अधिकारी सखाराम बिराजदार यांनी ही मोहिम सातत्याने राबविण्याचे आश्वासन दिले.

      सदर कारवाईसाठी पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती अश्विनी शेंडगे, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बापुसाहेब सांडभोर आणि म्हसवड पोलीस ठाण्याचे पथकातील अधिकारी-अंमलदार यांनी सहकार्य केले. यशस्वी कारवाईबद्दल सर्व अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन करण्यात आले.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!