गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये नांव नोंद केले.बद्दल सुजल अप्पासो माळवदे याचा नासपचे जिल्हा अध्यक्ष इंजि सुनील पोरे यांचेहस्ते सत्कार

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड

          शिरवडे ता. कराड जि. सातारा येथील रहिवासी, श्री. रघुनाथ शंकर माळवदे यांचा नातू आणि इंजि. सुहास उर्फ आप्पासो रघुनाथ माळवदे यांचे चिरंजीव, कु. सुजल अप्पासो माळवदे (वय १३ वर्षे) याने आपल्या कौशल्याने आणि जिद्दीने एक मोठा विक्रम प्रस्थापित केला आहे. सुजलने *Fastest 100 M Backwards on skates using two wheels* या प्रकारामध्ये ७६ तास सलग स्केटिंग करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये आपले नांव कोरले आहे.

      हा विक्रम बेळगाव, कर्नाटक येथे दिनांक २६ मे ते ३१ मे २०२४ या कालावधीत झाला. सुजलच्या या असामान्य यशाबद्दल नासपचे जिल्हा अध्यक्ष, इंजि. सुनील पोरे यांच्या हस्ते त्याचा सन्मान करण्यात आला. यावेळी वरुडे रावसाहेब, पत्रकार पोपटराव बनसोडे, अहमद मुल्ला गणेश वेल्हाळ (मसूर )निलेश जगदाळे (शिरवडे )उपस्थित होते
             मास्टर सुजल हा रयत इंग्लिश मिडीयम स्कूल, कराड येथे इ. ८ वी मध्ये शिकत असून तो इगल स्केटिंग अँड रोलबॉल अकॅडमी चा खेळाडू आहे. त्याने प्रशिक्षक राष्ट्रीय खेळाडू श्री. अझहर मुल्ला यांचे कडून शिकत त्याने जिल्हास्तरावर अनेक पारितोषक मिळवले

       सुजलने आपल्या या विक्रमाद्वारे सातारा जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. त्याच्या या यशामागे कुटुंबाची मोलाची साथ आणि प्रोत्साहन आहे. सुजलने या आधीही विविध स्पर्धांमध्ये आपल्या कौशल्याचे प्रदर्शन केले असून त्याला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. परंतु, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नाव नोंदवणे हे त्याचे एक मोठे स्वप्न होते, जे त्याने आपल्या अथक प्रयत्नाने आणि मेहनतीने पूर्ण केले आहे.

      सुजलच्या या विक्रमाने अनेक तरुणांना प्रेरणा मिळेल, सुजलच्या या यशाने केवळ त्याचे कुटुंबच नव्हे तर संपूर्ण समाज आणि जिल्ह्याचा गौरव वाढला आहे. असे मत इंजि. सुनील पोरे यांनी व्यक्त केले
    त्याच्या या यशासाठी त्याला सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कु. सुजल अप्पासो माळवदेच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देऊन अनेक मान्यवर, क्रीडाप्रेमी, आणि समाजातील विविध घटकांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

       नासपचे अध्यक्ष इंजि. सुनील पोरे साहेबांनी म्हसवड हुन आपल्या घरी येऊन आपल्या मुलाचा सत्कार करून त्याला शुभेच्छा दिल्या बद्दल आम्ही भारावून गेलो असल्याचे सुजलचे वडील आप्पासो माळवदे, आजोबा रघुनाथ माळवदे, आजी सुलोचना माळवदे, काका अरुण माळवदे, अनिल वेल्हाळ यांनी भावना व्यक्त करून त्याचे आभार मानले


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!