म्हसळा कुणबी समाज अध्यक्षपदी धोंडू चव्हाण,सचिवपदी महेश पवार यांची निवड

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसळा – सुशील यादव

तालुका कुणबी समाज पश्चिम विभागाच्या अध्यक्षपदी धोंडू चव्हाण तर सचिव पदावर महेश पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

     तालुका पश्चिम विभागाची सर्वसाधारण सभा मौजे आडी येथे सल्लागार मधुकर पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.सभेत समाज हिताचे निर्णय घेण्यात येतानाच पुढील काळात समाज हिताचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

     सभेत नवनिर्वाचित कार्यकारणीने जनजागृती करण्याचा संकल्प केला आहे.सभेला मोठ्या संख्येने महीला भगिनी उपस्थित होत्या.समाज हिताचे कार्यात महिलांचा सहभाग असावा या करीता विभागीय महिला कमिटी स्थापन करण्यात येणार असल्याचे सचिव महेश पवार यांनी महिती देताना सांगितले.

    नवनियुक्त कार्यकारणीत अध्यक्षपदी आडी गावचे धोंडू चव्हाण,उपाध्यक्ष महेंद्र धामणे,सचिव महेश पवार,सह सचिव सदानंद पाकड, खजिनदार शंकर उंडरे,सहखजिनदार राजेंद्र भोगल,वैभव शिगवण प्रसिद्धी प्रमुख तर सदस्य म्हणून संजय शिगवण,अनिल खेरटकर,शांताराम कोबनाक,देवजी चव्हाण,सुरेश चव्हाण,सल्लागारपदी मधुकर पवार,मनोहर डिंगनकर,रामचंद्र बोर्ले,किसन पवार,दौलत रटाटे,सुरेश धाडवे,भिकू चव्हाण यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!