श्री.अजितराव महादेव जगदाळे यांचे शैक्षणिक कार्य कौतुकास्पद – श्री.उदयजी शिंदे

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )

विजकुमार ढालपे
गोंदवले –

     जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोंदवले बुद्रुक नं.1 शाळेचे मुख्याध्यापक श्री.अजितराव महादेव जगदाळे यांचा सेवापूर्ती अभिष्टचिंतन सोहळा दहिवडी येथील बालाजी मंगल कार्यालयात नुकताच संपन्न झाला.
    सदर सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मा.श्री.उदयजी शिंदे माजी राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी मा.श्री.वामनराव जगदाळे साहेब यांची उपस्थिती होती

     यावेळी श्री.उदयजी शिंदे यांनी श्री.अजितराव जगदाळे यांच्या शैक्षणिक कारकीर्द विषयी विस्तृत माहिती दिली समाजातील तळागाळातील लोकांच्या मुलांना शिक्षणा विषयी गोडी लागावी म्हणून जगदाळे गुरुजींनी अविस्मरणीय शैक्षणिक कार्य कौतुकास्पद केले आहे असे स्पष्ट केले.
    प्रमुख पाहुणे श्री.वामनराव जगदाळे मा.शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी श्री.अजितराव जगदाळे यांच्या विषयी म्हणाले मी आणि अजितराव वर्ग मित्र होतो ते मुख्याध्यापक म्हणून ३८ वर्षं ७ महिने ३दिवस अशी प्रदिर्घ सेवा करुन सेवानिवृत्त होत आहेत त्यांचे शैक्षणिक कार्य उल्लेखनीय आहे त्यांनी घडविलेले अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत हिच त्यांच्या कार्याची पोहच आहे.
      सदर कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन केल्यानंतर जि.प.शाळा गोंदवले बुद्रुक येथील सौ.सविता शिलवंत, बल्लाळवाडी प्राथमिक शाळेतील उपशिक्षिका सौ.सिमा शिंदे/ मोहिते, अजितराव जगदाळे यांची कन्या कु.अमृता जगदाळे, जाव‌ई श्री . प्रसाद वाघाडे आदिनी मनोगत व्यक्त केले.
श्री.अजितराव जगदाळे यांचे चिरंजीव सुमित याने व्हिडिओ द्वारे वडीलांच्या शैक्षणिक कारकीर्दीचा संपूर्ण जीवनपट सादर केला त्या व्हिडिओला आवाजाची साथ श्री.अजितराव जगदाळे यांच्या ‌सौभाग्यवती सौ.सुनिता जगदाळे यांनी दिली तसेच सन्मानपत्र श्री.सागर जाधव यांनी तयार केले प्रास्ताविक श्री.संतोष घोडके यांनी केले.
     सदर कार्यक्रमास माण पंचायत समितीचे शिक्षणविस्तार अधिकारी श्री.रमेश गंबरे,शिक्षक बँकेचे चेअरमन श्री.किरण यादव,संचालक श्री.नितीन काळे,उ.स.वाघमोडे, शहाजी दडस तसेच डंगिरेवाडी, गोंदवले, म्हसवड, दहिवडी व परिसरातील ग्रामस्थ, शिक्षक/ शिक्षिका उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.हणमंतराव जगदाळे यांनी केले तर आभार श्री.श्रीकात दोरगे सर यांनी मानले.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!