व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
*म्हसवड:
अंगणवाडी क्रमांक 86, कोष्ट गल्ली, म्हसवड येथे अंगणवाडी प्रवेशोत्सवाचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे आयोजन अंगणवाडी सेविका सौ. अश्विनी अतुल फुटाणे मॅडम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत माननीय सौ. सुवर्णा सुनील पोरे (भारत गॅस एजन्सी, म्हसवड) यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमात नवागत मुलांचे स्वागत करण्यात आले व त्यांना विशेष खाऊचे वाटप करण्यात आले. अंगणवाडी सेविका सौ. अश्विनी अतुल फुटाणे मॅडम यांनी सर्व नवागतांना चिक्की वाटप केले, तर प्रमुख पाहुणे सौ. सुवर्णा सुनील पोरे यांच्या हस्ते नवागतांना बिस्किट पुड्यांचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी अंगणवाडी प्रकल्प अधिकारी माननीय सौ. ज्योती लंगुटे मॅडम आणि सुपरवायझर माननीय सौ. रेखा घोरपडे मॅडम ऍड. गौरी शुभम पोरे यांनी आपल्या मार्गदर्शनाने कार्यक्रमाला अधिक प्रेरणादायी बनवले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अंगणवाडी सेविका सौ. अश्विनी फुटाणे मॅडम आणि मदतनीस सौ. सुनिता गोंजारी मॅडम यांचे विशेष योगदान राहिले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि अंगणवाडीच्या या प्रयत्नांची प्रशंसा केली. या उपक्रमामुळे नवागत मुलांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले होते.