तंबाखू विरोधी दिनानिमित्त कृष्णा हॉस्पिटल प्रबोधन कार्यक्रम

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
कुलदीप मोहिते कराड

सविस्तर वृत्त..वृत्त 31 मे ‘जागतिक तंबाखूविरोधी दिना’ निमित्त ‘कृष्णा हॉस्पिटल’ च्या ‘स्कूल ऑफ डेंटल सायन्सेस’च्या ‘पब्लिक हेल्थ डेन्टिस्ट्री’ तर्फे ‘जयवंत शुगर्स, धावरवाडी’ येथे तंबाखूचे दुष्परिणाम यावर स्कूल ऑफ डेंटल सायन्सेस च्या विद्यार्थ्यांनी सुंदर अशी एकांकिका व त्या माध्यमातुन प्रबोधन व मार्गदर्शन केले.

       त्यासोबत सर्व कर्मचाऱ्यांच्या मुखाची तपासणी व समुपदेशन देखील यानिमित्ताने करण्यात आले याशिवाय तंबाखू बंद करण्याचा निर्धार केलेल्या कर्मचाऱ्यांना निकोटेक्स गोळ्यांचे सुद्धा मोफत वाटप करण्यात आले.
पब्लिक हेल्थ डेंटिस्ट्री विभागाच्या प्राध्यापिका डॉ अस्मिता हामंद यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तर जयवंत शुगर्सचे चिफ केमिस्ट भाऊसाहेब चव्हाणके, अधीक्षक राजाभाऊ सिरसाट व कृष्णा हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी सागर पवार यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
           यावेळी डीस्टीलरी मॅनेजर विक्रम म्हसवडे, मुख्य शेतकी अधिकारी राम पाटील, मटेरिअल मॕनेजर गजानन बाशिंगे व इतर अधिकारी,कर्मचारी व कामगार मोठया संख्येने उपस्थित होते


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!