व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला ) श्रीकांत जाधव उंब्रज
उंब्रज पोलिसांनी इंदोली( उंब्रज) ता कराड येथील शिवार गार्डन हॉटेलवर छापा टाकत देशी विदेशी दारूचा एकूण 12,300(बारा हजार तीनशे रुपयांचा) मुद्देमाल जप्त करत मोठी कारवाई केली आहे
याबाबत उंब्रज पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी कीउंब्रज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांनी उंब्रज परिसरातील अवैध्य दारू विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश उंब्रज पोलीस स्टेशनचे अंमलदार आणि अधिकारी यांना दिले होते. त्या अनुषंगाने दि.२२/५/२०२४ रोजी पोलीस उपनिरीक्षक रमेश ठाणेकर,पो.हवा. संजय धुमाळ,पो. कॉ.सागर साळे मी सरकारी वाहनातून पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय बातमी दाराकडून बातमी मिळाली की उंब्रज हद्दीतील हॉटेल शिवार गार्डन इंदोली, त्ता कराड चोरे रोड येथे अवैद्यरित्या दारूची विक्री होत आहे .
त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून हॉटेलवर छापा टाकला असताना, हॉटेल मालक अमितकुमार रामचंद्र निकम रा. इंदोली ता.कराड हा इसम त्या हॉटेलच्या आडोशास अवैधरित्या दारू विक्री करताना आढळून आला. लगेचच पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडुन त्याच्या जवळील देशी आणि विदेशी दारूचा एकूण १२,३००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. सदर इसमास ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास उंब्रज पोलीस करीत आहेत .
सदरची कामगिरी ही सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक रमेश ठाणेकर, पोलीस हवालदार संजय धुमाळ, पोलीस कॉन्स्टेबल निलेश पवार, पोलीस कॉन्स्टेबल सागर साळे यांनी केली आहे.