व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला ) म्हसवड वावरहिरे ता. माण येथील एक अल्पवयीन मुलगी मुलाच्या घरासमोर जाऊन माझेशी लग्न कर असे म्हणुन रोज शिवीगाळ, दमदाटी करून आत्महत्या करणेची धमकी देत होती तिच्या रोजच्या जाचाला कंटाळून मुलाने आत्महत्त्या करून आपले जीवनच संपवलेची घटना वावरहिरे ता. माण येथे घडली. या बाबत दहिवडी पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी
दिनांक 15/05/2024 रोजी 12.00 वा.चे सुमारास आरोपी अल्पवयीन मुलगी ही घरासमोर येवुन मुलगा बापु यास माझेशी लग्न कर असे म्हणुन त्यास शिवीगाळ, दमदाटी करून आत्महत्या करणेची धमकी देवुन झटापटी करून त्यास वेळोवेळी त्रास देवुन आज रोजी दुपारी 1.30 वा. चे दरम्यान मौजे वावरहिरे ता. माण गावचे हद्दीत माझे राहते घरात माझा मुलगा बापू जक्कल काळे वय 18 वर्षे रा. वावरहिरे ता. माण जि. सातारा यास आत्महत्या करणेस प्रवृत्त केले आहे. म्हणून मुलाची आई सौ. कविता जक्कल काळे वय 37 वर्षे, व्यवसाय तमाशा/जागरण, जात-पारधी, रा. वावरहिरे ता माण जि. सातारा हिने अल्पवयीन मुलगी रा. वावरहिरे ता. माण जि. सातारा हिचेविरुद्ध दहिवडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे
म्हणुन मजकूर च्या खबरी वरून अल्पवयीन मुलीवर गु. र. नं.216/2023 IPC 306, 323 , 504, 506, अनु. जाती अनु. जमाती अत्या. प्रति. अधि. कलम 3(2)(5), 3 (2)(Va) , प्रमाणे. गुन्हा रजी. दाखल केला आहे घटना स्थळी मा. उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे सो दहिवडी विभाग कॅम्प वडूज यांनी भेट दिली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास स.पो.नि.अक्षय सोनवणे करत आहेत