माळशिरस नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी ताई वावरे बिनविरोध निवड
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
शौकत पठाण
माळशिरस
माळशिरस नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी ताई सचिन वावरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. पैलवान शिवाजी देशमुख यांनी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर सदरची जागा ही रिक्त झाली होती. यासाठी ताई सचिन वावरे यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता. केवळ एकच अर्ज आल्यामुळे जिल्हा अधिकारी यांनी पिटासीन अधिकारी म्हणून वि.ना. पवार यांच्या अध्यक्षखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.


