व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला ) म्हसवड /प्रतिनिधी :- भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न, बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली आज सकाळी प्रथम पंचशील ध्वजाचे पुजन संयोजकांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर विहारातील डॉ बाबासाहेब आंबेडकर तथागत बुद्ध, शाहू महाराज , म फुले, छ. शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, माता रमाबाई, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमानां उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्प अर्पण करून बुद्ध, धम्म, संघ वंदना कुमार सरतापे यांनी घेतल्या नंतर उपस्थितांनी महामानवाने अभिवादन केले
दरम्यान डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आ जयकुमार गोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रभाकर देशमुख, राष्ट्रवादी युवकचे सरचिटणीस अभयसिंह जगताप, माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा, नितीन दोशी , आ गोरे यांच्या पत्नी सोनियाताई गोरे, माजी उपनगराध्यक्षा स्नेहलताई सुर्यवंशी, युवराज सुर्यवंशी, जगन्नाथ लोखंडे , शहाजी लोखंडे, ,करण सिन्हा , पृथ्वीराज राजेमाने, तेजसिह राजेमाने, बाळासाहेब पिसे,आदी अनेक मान्यवरांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले
जयंती निमित्ताने भारतीय संविधान व कलमे याची सखोल माहिती युवा व्याख्याते रोहीत लोहार, डॉ तायडे , श्रेया बनसोडे, यश धाईजे, तनिष्का सरतापे, शरण्या सरतापे यांनी डॉ बाबासाहेब व त्यांचे तरुणां विषय मत, त्याच प्रमाणे तथागत बुद्ध व त्यांचा धम्म या विषयावर भाषणे झाली
दुपारी बारा नंतर अन्नदानाचा कार्यक्रम घेण्यात आला सांयकाळी पाच नंतर भव्य मिरवणुक काढण्यात आली यावेळी हजारो भिम अनुयायी पांढरी वस्त्रे परिधान करून निळे फेटे, निळे उपरणे गळ्यात घालून सहभागी झाले होते यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर,गौतम बुद्ध, छ शिवाजी महाराज महात्मा फुले, आण्णाभाऊ साठे राजे उमाजी नाईक संत बश्वेश्वर, शाहू महाराज यांच्या जयघोषात मिरवणूक काढण्यात आली महिलांचे लेझीम व भिम गितावरील नृत्य, हलगी, घुमक्याच्या निनादाने परिसर दणाणून सोडला होता म्हसवड व पर्यंती देवापुर,पुळकोटी, शिरताव, वरकुटे मलवडी, धुळदेव,हिंगणी, कारखेल, खुटबाव,रांजणी, पळशी, जाशी, वडजल, दिवड, कुकूडवाड भागातील हजारो धम्म बांधव , महिला, तरुण व तरुणी मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते तब्बल साडेतीन तास सुरू असलेली मिरवणूक रात्री दहा वाजता हजारो भिम सैनिकांच्या उपस्थितीत मिरवणूक उत्साहात संपन्न झाली