व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला ) विजयकुमार ढालपे
गोंदवले-
गोंदवले खुर्द येथील श्री.विजय रामचंद्र ढालपे सर यांच्या सौभाग्यवती सौ.स्वाती विजय ढालपे यांनी शिक्षणशास्त्र महाविद्यालयात अधिव्याख्याता म्हणून कार्य करुन नुकतीच कायद्याचे शिक्षण पूर्ण करून वकिली व्यवसाय प्रारंभ केला त्यामुळे त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन श्री.एम.डी.दडस सर जिल्हा संपर्कप्रमुख व कराड पाटण सोसायटीचे संचालक यांनी केले माण तालुका शिक्षण समिती तर्फे अध्यक्ष संतोष घोडके सर यांनी सौ.स्वाती ढालपे यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन माण पंचायत समितीच्या बि.आर.सी.मध्ये आयोजित केले होते यावेळी श्री.श्रीकात दोरगे उपाध्यक्ष सातारा जिल्हा शिक्षक समिती, श्री.एम.डी.दडस जिल्हा संपर्कप्रमुख सातारा जिल्हा शिक्षक समिती, श्री.संतोष घोडके अध्यक्ष माण तालुका शिक्षक समिती, श्री नितीन काळे संचालक प्राथमिक शिक्षक बँक, श्री.महेद्र शिलवंत नेते माण शिक्षक समिती, श्री.महादेव महानवर विभागीय उपाध्यक्ष शिक्षक समिती, श्री.नवनाथ खरात उपाध्यक्ष, श्री.आकाराम ओबासे उपाध्यक्ष, श्री.प्रमोद मंगरुळे कोषाध्यक्ष, श्री.विनोद शिलवंत संपर्क प्रमुख, श्री.कालिदास जाधव व श्री.कोलवडकर सर सहसचिव, श्री.प्रविण शिलवंत आदी उपस्थित होते.