शिस्त पाळा ,कारवाई टाळा : म्हसवड चे सिंघम ए.पी.आय.,एस.बिराजदार यांचेकडून धडाकेबाज कारवायांची अपेक्षा वाढली..

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
(दिलीपराज कीर्तने )

म्हसवड:प्रतिनिधी
‘        म्हसवडला कायदा आणि सुव्यवस्थेची जरब बसविणारा सिंघम पोलीस अधिकारी अत्यावश्यक होता, ” शिस्त पाळा,कारवाई टाळा”,हे साधं,सुटसुटीत ब्रिद,तमाम जनतेला पटवून देवून,योग्य धडा शिकवणारा, ए.पी.आय. एस.बिराजदार यांच्या रूपाने तसा सिंघम पोलीस अधिकारी म्हसवड करांना मिळाल्याने म्हसवड आणि परिसरात समाधान व्यक्त होत असून त्यांच्याकडून अशाच धडाकेबाज कारवायांची अपेक्षा वाढली आहे.
            म्हसवड पोलीस स्टेशनला हजर झाल्यापासून एपीआय एस बिराजदार यांनी चांगलाच कायद्याचा वचक निर्माण केला आहे म्हसवड शहरात सर्वत्र अशी चर्चा सुरू आहे की, बिराजदार साहेब हजर झाल्यापासून बेकायदेशीर धंद्यावर धाडसत्र सुरू केले आहे बेकायदेशीर असेल तर व्यवसाय छोटासा किंवा मोठा कारवाई होणारच असा पवित्र घेतला आहे ,त्यामुळे बेकायदेशीर व अवैद्य व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना जरब बसली आहे त्यामुळे बिराजदार साहेबांच्या कामाचा धसका अनेकांनी घेतला आहे.
       मात्र ,नुकत्याच दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या असून म्हसवड शहर व परिसरात दोन्ही परीक्षांची केंद्रे सध्या सुरू आहेत.दहावी व बारावीच्या परीक्षेला येताना बहुतांशी विद्यार्थी व विद्यार्थिनी सुद्धा दुचाकीवरून म्हसवड व ग्रामीण भागातून परीक्षा केंद्रावर येत असल्याचे चित्र आहे.
पेपर सुटल्यावर काही विद्यार्थी म्हसवड शहरात व पेठेत ,बस स्थानक चौकात बेशिस्त व भरधाव दुचाकी चालवून मौत का कुआ स्वतःसाठी व दुसऱ्यासाठीही खोदत असल्यामुळे नाहक पादचारी व दुसऱ्या दुचाकी व चार चाकी वाहन चालकांना त्रास देत आहेत त्यांना कोणी समजावण्याचा प्रयत्न केल्यास दादागिरी व अरेरावी सुरू होते त्यांना आवरणे कठीण जात आहे .,आई-वडिलांच्या जीवावर स्वतःची ऐश व चैन करणाऱ्या या बहाद्दर गड्यांना वेगळीच ऐट व फुशारकी मारल्याचे समाधान होत आहे. त्यांच्या बेफाम वागण्याने काही वेळा निरपराध लोकांना त्रास सहन करावा लागतोय म्हणून या सुसाट दुचाकी चालकांना बिराजदार साहेब जरा आवराच असा लोकांचा सूर होता,,,,
एपीआय. एस.बिराजदार यांनी या मागणीची तातडीने दखल घेत म्हसवड शहरात कारवाईला सुरुवात करून शहरातील मुख्य रस्त्यावरील पार्किंग व्यवस्था पाहणी करताना ,’ शिस्त पाळा आणि कारवाई टाळा’ असे आवाहन केले आहे.
      रात्री ७ वाजणेच्या • सुमारास म्हसवड पोलीस स्टेशनचे एपीआय बिराजदार यांनी आपल्या पोलीस टीमसह पोलीस स्टेशन पासून, चांदणी चौक, बस स्थानक चौक, – शिंगणापूर चौक, महात्मा फुले चौक व नविन नगरपालिका इमारतीपर्यंत रस्त्यावर सुरु असलेल्या पार्किंगची पाहणी करीत पायी चालत जाऊन
बेशिस्त दुचाकी पार्किंग करणारांना सूचना केल्या. बेशिस्त दुचाकी स्वारांना थांबवून समज देण्यात आली. शिंगणापूर चौक, ते चांदणी चौक या मुख्य रस्त्यावर त्यांनी पहाणी केली. पांढऱ्या रेषेच्या बाहेर दुचाकी अथवा चार चाकी वाहने कुणीही लावून जाऊ नये कारण रेषेच्या बाहेर उभी असणारी वाहने मुख्य वाहतुकीला अडथळा ठरत आहेत. बस स्थानक चौक ते नगरपरिषद पर्यंत दुकानदार व वाहने पार्किंग करताना पादचारी व इतर वाहनाना अडथळा होईल अशी कृती करू नये, असे आवाहन त्यांनी सर्वांनाच केले आहे. आमचे पोलीस कुणालाच जाणीवपूर्वक त्रास देणार नाहीत मात्र नागरिकांनी शिस्त पाळावी. शिस्त मोडून कोणी वागत असेल तर कारवाई होणारच असेही त्त्यांनी ठामपणे सांगितले,,,
========================


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!