माण तालुक्यातील १ हजार ५४ विद्यार्थ्यानी दिली प्रज्ञाशोध परीक्षा

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड-प्रतिनिधी
      माण तालुक्यातील सर्व जि.प.शाळेतील इयत्ता चौथी च्या विद्यार्थ्यां साठी आयोजित करण्यात आलेली प्रज्ञाशोध परीक्षा रविवार दिनांक १७ रोजी महात्मा गांधी विद्यालय दहिवडी व प.म. शिंदे कन्या विद्यालय दहिवडी येथे पार पडली
      या परिक्षेसाठी ऑनलाईन नों दणी झालेले विद्यार्थी संख्या १०४३ होती. ऐनवेळी प्रविष्ट झालेले विद्यार्थी संख्या ११ असे एकूण १०५४ विद्यार्थी नोंद झाले होते
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेची पूर्वतयारी तसेच इतर स्पर्धा परीक्षांची तयारी होण्यासाठी या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.

      तालुका स्तरावर पहिले वीस क्रमांक तसेच केंद्र स्तरावर पहिले तीन क्रमांक यांना रोख बक्षीस, ट्रॉफी तसेच प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

          माण तालुक्यात सदरच्या परीक्षेचे आयोजन पंचायत समिती सेस फंडातून करण्यात आले होते. यासाठी तत्कालीन गटविकास अधिकारी राऊत साहेब व गटविकास अधिकारी श्री. बोडरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेचे आयोजन करण्यात आले. यासाठी डायट फलटणचे अधिव्याख्याता श्री कोकरे साहेब यांचे बहुमूल्य योगदान मिळाले यावेळी गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. पालकांनी या उपक्रमाचे कौतुक केले.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!