व्हिजन २४तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला ) सातारा प्रतिनिधी:
नुकत्याच भारत सरकारच्याmsmepci विभागाच्या नियुक्ती पार पाडल्या यावेळी सातारा जिल्ह्याच्या msmepci सातारा जिल्हा चेअरमन पदी मिलिंद लोहार यांची नियुक्ती करण्यात आली तर उपाध्यक्षपदी कुलदीप मोहिते व मिलिंदा लोहार यांची नियुक्ती करण्यात आली
प्रसारमाध्यमांशी बोलताना मिलिंद लोहार म्हणाले की प्रत्येक महिलेने उद्योजक बनले पाहिजे तसेच msme च्या माध्यमातून जिल्ह्यातील उद्योगाला चालना देणार असून सर्व सरकारी योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार आहे
राष्ट्रीय मिल मजदूर संघ कॅम्पस मामा फाळके हॉल आंबेडकर रोड परेल भोईवाडा मुंबई या ठिकाणी एम एस एम इ पी सी आय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या योजना वेळी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा अध्यक्ष उपाध्यक्ष निवड प्रक्रिया करण्यात आली
भारतीय अर्थव्यवस्था बळकटीसाठी कुटीर आणि मध्यम व्यवसाय सरकार द्वारा मोठी पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे एम एस एम इ पी सी आय यांच्यामार्फत देशातील उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी व तळागाळातील नागरिकांपर्यंत सरकारी योजना पोहोचण्यासाठी एम एस एम इ पी सी आय काम करत आहे स्वयं मध्यम उद्योग मंत्रालय यांच्याद्वारे msmepci हे सेक्टर ग्रामीण भागातील विकास कामांना मजबुती देण्यासाठी व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांपर्यंत सरकारी योजना पोहोचण्यासाठी जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष व तेथील संपूर्ण टीम काम करणार आहे.मुंबई येथील कार्यशाळेमध्ये प्रमुख पाहुणेप्रदीप मिश्रा सरकार चेअरमन एम एस एम इ पी सी आय इंडियाशिबुराजन चेअरमन एम एस एम इ पी सी आय महाराष्ट्रअभिषेक मिश्रा डेप्युटी चेअरमन एम एस एम ई पी सी आय इंडियायांच्या हस्ते सर्टिफिकेट व अपॉइंटमेंट लेटर देऊन मिलिंद लोहार यांचा सन्मान करण्यात आला.
तसेच मिलिंद लोहार यांनी सांगितले की जिल्ह्यातील सूक्ष्म व लघुउद्योग त्याला चालना देण्याचे काम लवकरच करण्यात येईल जिल्ह्यातील शेतकरी तसेच लघु मध्यम उद्योग त्यांच्यापर्यंत सर्व सरकारी योजना पोहोचवण्याचे काम माझ्या व माझ्या टीमच्या माध्यमातून करण्यात येईल. मुंबई येथे झालेल्या कार्यशाळे वेळी आनंद गायकवाड व्हॉइस चेअरमन मुंबई/कोकण रिजन अनुप ढम चेअरमन पश्चिम महाराष्ट्र श्री नाईकवडे धम्मशील सावंत रायगड जिल्हा चेअरमन जय कराडे कोल्हापूर जिल्हा चेअरमन मिलिंदा पवार सातारा जिल्हा व्हाईस चेअरमन कुलदीप मोहिते सातारा जिल्हा व्हाईस चेअरमन अमोल खवले पुणे जिल्हा व्हाईस चेअरमन संध्या नारायण कर पुणे जिल्हा चेअरमन वैशाली नवले पुणे जिल्हा चेअरमन यांचे प्रमुख उपस्थिती होती