सौ मंगलताई रामचंद्र जगताप महिला महाविदयालय उंब्रज यांना युवतींबरोबर युवकानाही सह.अध्ययन घेण्याची मान्यता
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
कुलदीप मोहिते उंब्रज कराड
श्री शिवयोद्धा प्रतिष्ठानच्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून उंब्रज मधील सौ. मंगलताई रामचंद्र जगताप महाविद्यालयात सह अध्ययन घेण्याची मान्यता शासनाकडून प्राप्त झाली आहे
एकनाथजी शिंदे ,मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य हे २४ व २५ जानेवारी २०२४ रोजी हे त्यांच्या दरे या जन्मगावी आले होते.यावेळी उंब्रज श्री.छ.शिवाजी महाराज पुतळा परिसर सुशोभीकरणासाठी त्यांनी रुपये ५० लक्ष दिले म्हणून प्रतिष्ठानचे वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला होता.तसेच उंब्रज येथील सौ मंगलताई रामचंद्र जगताप महिला महाविद्यालयात युवतींबरोबर युवकांनाही सह-अध्ययानाची मान्यता मिळावी म्हणून श्री.शिव योद्धा प्रतिष्ठान उंब्रज यांचेतर्फे मागणीचे निवेदन व महाविद्यालयाची इतर कागदपत्रे सादर केली होती .यावेळी मुख्यमंत्र्यानी संबंधीत शिक्षण अधिकाऱ्यांना उंब्रज येथे सौ.मंगलताई रामचंद्र जगताप महिला महाविद्यालयमध्ये सह-अध्ययन करणे बाबत सक्त सूचना संबंधित विभागाला दिल्या होत्या .
श्री शिव योध्दा प्रतिष्ठान हे काम होणेसाठी आग्रही होते व प्रतिष्ठान वेळोवेळी पाठपुरावाही करत होते त्यामुळे मुख्यमंत्र्यानीही यासाठी भरपूर वेळ दिला होता. यावेळी श्री शिव योद्धा प्रतिष्ठानचे पदाधिकारी तसेच उंब्रजचे माजी सरपंच व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य कै.दत्तात्रय जाधव (आबा) उपप्राचार्य साळुंखे सर तानाजी कदम सर व अधिकराव गरुड सर हे उपस्थित होते.
याआधी पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनाही या संदर्भात निवेदन देण्यात आले होते. त्यावेळीही प्रतिष्ठानचे पदाधिकारी महाविद्यालयतर्फे प्रा. मच्छिंद्र सकटे सर हे उपस्थित होते. प्रतिष्ठानच्या पाठपुराव्याची दखल घेत
एक मार्च रोजी सौ मंगलताई रामचंद्र जगताप महिला महाविदयालय उंब्रज यांना युवतींबरोबर युवकानाही सह.अध्ययन घेण्याची मान्यता मिळाली .
महाराष्ट्रातून एकूण सहा महावियालयांचे सह-अध्ययन मान्यतेसाठी प्रस्ताव होते. परंतू उंब्रजसाठी श्री शिव योध्दा प्रतिष्ठान यांनी केलेला पाठपुरावा व मुख्यमंत्र्यांनी संबंधीत विभागाला तत्परतेने दिलेल्या सूचना यामुळे सौ.मंगलताई रामचंद्र जगताप महिला महाविद्यालय यांना ही मान्यता आचारसंहिता लागण्याची आधी मिळाली आहे. अशी माहिती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आलेली आहे