बॅ.अंतुले यांना हिरवासाप आणि शरदचंद्रजी पवार साहेबांवर कडवट बोलणारे अनंत गीते यांना माझ्यावर टिका करण्याचा अधिकार नाही – खासदार सुनिल तटकरे
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
रायगड
म्हसळा – सुशील यादव
राज्यात आणि केंद्रात एनडीए महायुतीच्या सरकार मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट सामील झाल्या नंतर आमचा सेक्युलरझम संपला अशी निवडणुकीच्या तोंडावर मताचा जोगवा मागण्यासाठी, जे भाषणाची सुरुवात करताना फक्त माझ्या तमाम हिंदु बंधु आणि भगिनी अशी साद घालत बोलणारे माजी खासदार अनंत गीते यांना आमच्यावर टिका टिपण्णी करण्याचा नैतिक अधिकार नसल्याचा खुलासा खासदार सुनिल तटकरे यांनी म्हसळा शहरातील जामिया मोहम्मदिया कोकण(मदरसा)येथील थ्री-फेस इलेक्ट्रिक ट्रान्सफार्मचे उद्घाटन सोहळा कार्यक्रमात व्यक्त केला.
आमच्या धर्मनिरपेक्ष विचारावर प्रश्न निर्माण करणारे लोकांची दिशाभुल करीत आहेत हेच अनंत गीते सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत श्रीवर्धन येथे बॅरिस्टर अंतुले साहेबांना हिरवा साप आणि पवार साहेबांवर कडवट बोलत होते ते आता माझ्यावर टिका करत आहेत ते समजुन घ्यायला हवी.


