कुंभारगावच्या जि.प.प्राथमिक शाळेला सैन्य दलातील अधिकाऱ्यांची भेट

बातमी Share करा:

व्हिजन २४तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )

गणेश मिंड
इंदापुर (प्रतिनिधी)

पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये सैन्य दलामध्ये कार्यरत असणारे ब्रिगेडियर प्रताप मलिक साहेब कर्नल सतीश शिंदे साहेब या सैन्य दलातील कार्यरत अधिकाऱ्यांसह सुप्रसिद्ध उद्योगपती जसपाल जुनेजा यांनी कुंभारगाव जिल्हा परिषद शाळेला भेट दिली.

       कुंभारगावचा इतिहास हा सैन्य दलाशी सैन्याशी निगडित असल्याचे यावेळी ब्रिगेडियर प्रताप मलिक साहेब यांनी सांगितले. एक एप्रिल 1943 रोजी कुंभारगाव या ठिकाणी 9 पॅरा फिल्ड ही सैन्य दलाची तुकडी कार्यरत होती. उजनी धरणाची सुरुवात झाल्यामुळे 9 पॅरा फिल्ड ही तुकडी आग्रा उत्तर प्रदेश या ठिकाणी स्थलांतरित झाली. कुंभारगावच्या मातीशी सैन्य दलाचे अत्यंत जवळचं नातं आहे असं ब्रिगेडियर प्रताप मलिक यांनी सांगितले. 1943 मध्ये हिंदुस्थानचे 9 प्राची अधिकारी मेजर जनरल रणबीर बक्षी यांच्या सुकन्या श्रीमती सुनिता गरवारे यांनी विद्यार्थ्यांसाठी पाच लक्ष रुपयांचे शौचालय युनिट, दीड लक्ष रुपयांची सुसज्ज संगणक लॅब, 50 इंची 4 टिव्ही गरवारे बेस्ट्रेच सोशल फौंडेशन पुणे यांचे माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यांसाठी या अगोदर दिल्याचे सांगितले तसेच कॅप्टन श्री.विजय भूषण यांनी ग्रंथालयासाठी दोन बुकशेल्फ दिले होते. कॅप्टन श्री.प्रकाश नेरुरकर साहेब यांनीदेखील शाळेला गेल्यावर्षी एक लक्ष रुपयांचे खेळांचे साहित्य उपलब्ध करून दिले असल्याची माहिती मुख्याध्यापक श्री.ताराचंद ढोले सर यांनी दिली.

    ब्रिगेडियर प्रताप मलिक साहेब यांचे शाळेने स्वागत केले, तसंच जिल्हा परिषद पातळीवरील यशवंतराव चव्हाण कला, क्रीडा स्पर्धेत पुणे जिल्ह्यामधून प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक,तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करून या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना बक्षीसे दिली. तसेच शाळेला मदत म्हणून प्रत्येक अधिकाऱ्याने दरवर्षी अकरा हजार रुपये देण्याचे जाहीर केले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री अनिल धुमाळ, अग्निपंख फ्लेमिंगो पॉईंट कुंभारगावचे प्रमुख श्री.संदीप नगरे, शाळेतील शिक्षक श्री.बाजीराव गावडे, श्री राम चौधर, श्री.संतोष इंगुळकर, श्री.शहाजी म्हेत्रे, श्री.राजेंद्र खोमणे, सौ.ललिता साबळे मॅडम उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संतोष वणवे सर यांनी केले.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!