वडजल केंद्राची माहे फेब्रुवारीची शिक्षण परिषद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढाकणी ता.माण येथे संप्पन्

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
विजयकुमार ढालपे 
गोंदवले –

     वडजल केंद्राची माहे फेब्रुवारीची शिक्षण परिषद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढाकणी ता.माण येथे माणचे गटशिक्षणाधिकारी एल.एम.पिसे व कुकुडवाड बिटचे शिक्षण विस्तार अधिकारी रमेश गंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वडजल केंद्राचे केंद्रप्रमुख अशोक गंबरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात संप्पन् झाली.

      प्रथम सत्रात अध्ययन निष्पत्ती निहाय प्रश्ननिर्मिती करणे या विषयी श्री.संभाजी शिंदे सर शाळा नरबटवाडी यांनी मार्गदर्शन केले तसेच विद्याजली पोर्टल  विषयी माहिती सौ पल्लवी नवत्रे शाळा वडजल यांनी सखोल माहिती दिली तदनंतर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा सेल्फी मार्गदर्शन याविषयी श्री अजित गेड शाळा ढाकणी यांनी मार्गदर्शन केले.

     केंद्रप्रमुख अशोक गंबरे यांनी ऐनवेळच्या विषया मध्ये केंद्रातील सर्व शाळेतील शैक्षणिक आढावा घेतला व मार्गदर्शन केले तसेच बाल आनंद मेळावा विषयी नियोजन करून जि.प.प्राथमिक शाळा ढाकणी येथे गुरुवार दिनांक २९ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आल्याचे जाहीर केले.

      शिक्षण परिषदेचे सुत्रसंचलन सौ सरीता नवत्रे यांनी केले तर आभार श्री सुधाकर मोरे सर यांनी मानले.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!