सिद्धनाथ हायस्कुल व ज्यू कॉलेज म्हसवड परीक्षा केंद्रावर एस एस सी ची परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा :  नितीनशेठ दोशी

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड

        महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोल्हापूर विभागातर्फे आयोजित केलेल्या एस.एस.सी बोर्ड परीक्षा मार्च २०२४ ची परीक्षा  आज शुक्रवार दि. १ मार्च २०२४ पासून सुरु होत आहे या  परीक्षेकरिता बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना नितीनशेठ दोशी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत

         सिध्दनाथ हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, म्हसवड केंद्र क्र. 1404 या केंद्रावरती  सुरु होत असलेल्या एस एस सी परीक्षे साठी   सिद्धनाथ हायस्कुल व ज्यू कॉलेज म्हसवड, ज्ञानवर्धिनी हायस्कुल म्हसवड ; सरस्वती विद्यालय म्हसवड ,क्रांतिवीर विद्यालय म्हसवड, कारखेल विद्यालय, धुळदेव विद्यालय, खडकी विद्यालय , पुळकोटी विद्यालय  या ठिकाणचे  एकुण५११ विद्यार्थी परीक्षा देणार असून सर्व विद्यार्थ्यांनी  तणावमुक्त आणि भयमुक्त वातावरणात आत्मविश्वासाने परीक्षा द्याव्यात असे आवाहन करून नितीनशेठ दोशी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!