महात्मा बसवेश्वर सामाजिक सेवा मंडळ,सातारा यांच्या वतीने बसव भूषण पुरस्कार 2024 चे वितरण सोहळा

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज  (संपादक:अहमद मुल्ला )
कुलदीप मोहिते 
सातारा, 

        महात्मा बसवेश्वर सामाजिक सेवा मंडळ,सातारा यांच्या वतीने वितरित केला जाणारा सन  २०२४ सालचा  अतिशय प्रतिष्ठेचा  ‘बसव भूषण पुरस्कार ‘वितरण सोहळ्याचे आयोजन  रविवार,दि .१८ फेब्रुवारी २०२४ रोजी संध्या ४ वा. प. पू.औंधकर मठ ,सातारा येथे  करण्यात आले आहे

      यावेळी समाजभूषण मा.भारत शेठ बारवडे , काव्य व साहित्य भूषण मा.महालिंग मेन कुदळे,सहकार भूषण मा.दिलीप पिलके, उद्योग भूषण मा.राजेंद्र आटकेकर व कृषी भूषण मा.राजेंद्र लोखंडे यांना महाराष्ट्र राज्याचे मा.मंत्री दिलीपरावजी सोपल साहेब, विरशैव इंटरनॅशनल चे असोसिएशन चे अध्यक्ष तथा सहकार महर्षी मा.ओम प्रकाश उर्फ काकासाहेब कोयटे,लिंगायत संघर्ष समितीचे अध्यक्ष मा.सुनीलशेठ रुकारी, ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट चे संचालक मा.प्रकाश शेठ गवळी सावकार, पेट्रोलियम उद्योजक मां.राजेंद्रशेठ घुटे,राष्ट्रीय लिंगायत संघ अध्यक्ष मा. प्रदिपबापू वाले या मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहेत.

         तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे.असे आवाहन निमंत्रक संस्थापक अध्यक्ष सागर कस्तुरे,उपाध्यक्ष श्रीनिवास कामळे,सचिव महादेव मेंडीगिरि,कोषाध्यक्ष ॲड. सिद्धराज शेटे ,संचालक सदस्य नंदकुमार गुरसाळे, किरण लखापती,सुभाष ताटे, सौ. निर्मलादेवी बारवडे ,वीरशैव लिंगायत समाज,सातारा महिला मंडळ अध्यक्षा श्रीमती नंदाताई चिंचकर,बसव विचार निमंत्रक अक्षय विघ्ने यांनी केले आहे


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!