सातारा येथे शिंपी समाज वधु-वर मेळावा संपन्न
व्हिजन २४ तास न्युज (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड
समस्त शिंपी समाज सामाजिक संस्था सातारा यांच्यातर्फे स्वयंवर वधु वर पालक परिचय मेळावा 2024 .
हा मेळावा दिनांक 4 फेब्रुवारी 2024 रोजी संपन्न झाला
या वधुवर पालक परिचय मेळाव्यात जवळपास साडेचारशे वधू-वरांची नोंद झाली.

इंजि सुनील पोरे यांच्या प्रेरणेतून सातारा जिल्हयातील शिंपी समाजाचा हा पहिलाच वधुवर सूचक मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवातीला संत शिरोमनी नामदेव महाराज यांचे सतरावे वंशज हभप निवृत्ती महाराज नामदास,जिल्हाध्यक्ष सुनील पोरे,सतीश वेल्हाळ,मनोज कुबडे यांचे हस्ते दिप प्रज्वलनाने करण्यात आली यावेळी कुमारी – सई सचिन बारटक्के. इयत्ता – ९ वी, कु. अंतरा निलेश पाटुकले. इयत्ता – ९ वी कु. अस्मि शैलेश पाटुकले. इयत्ता – ६ वी या शालेय विद्यार्थिनींनी सुंदर अशी गणेश वंदना करुन कार्यक्रमास छानशी सुरुवात केली त्याबद्दल ना.स.प. जिल्हाध्यक्ष इंजि.सुनील पोरे साहेब यांनी त्यांचा सत्कार केला



