म्हसवड येथे पी एम किसान योजनेचे शिबीर उत्साहात संपन्न.

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज  (संपादक :अहमद मुल्ला )

म्हसवड

         केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये मिळतात. ही रक्कम हप्त्यांमध्ये दिली जाते. एका वर्षात ३ हप्ते आहेत या योजनेचा लाभ देशातील अनेक  शेतकऱ्यांना होत आहे

                    म्हसवड शहरात मात्र  पी एम किसान योजना सुरु झाल्यापासून हजारो लोकांना पी एम किसान चे सरकारी हफ्ते मिळत नव्हते वारंवार लोक आपल्या तक्रारी आमदार जयकुमार गोरे भाऊंना सांगत होते या कामाकरिता प्रत्येक वेळेस लोकांना दहिवडीला जावे लागत होते दहिवडीला जाणे येणे त्रासाचे होत होते  त्या गोष्टीचा विचार करून आमदार गोरेनी माणचे तहसीलदार. तालुका कृषी अधिकारी यांची बैठक घेऊन सूचना देऊन म्हसवडलाच   तलाठी कार्यलयात  शिबीर घेण्याबाबतच्या  सूचना दिल्या. त्यानुसार पोस्ट ऑफिस. कृषी अधिकारी.महसूल अधिकारी यांनी या शिबिराचे योग्य नियोजन केले  आणी सलग ३ दिवस ४,५,६ या तारखेला तलाठी कार्यालय येथे मोठ्या उत्साहात शिबीर संपन्न झाले या शिबिरात जवळ जवळ ११०० लोकांचे त्रुटी असणारी प्रकरणे मार्गी लागली. ह्याबद्दल म्हसवड कर नागरिक आमदार जयकुमार गोरे भाऊंना धन्यवाद देत आहेत ह्या शिबिराला स्वतः माण चे तहीसलदार विकास अहिर. तालुका कृषी अधिकारी. वैभव लिंगे. हजर होते. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी तलाठी आकडमल , गुलाबराव उगलमोगले आणणा.मंडळ कृषी अधिकारी बनसोडे.कृषी सहायक कुंभार.लोखंडे साहेब. महासूल कर्मचारी. वैभव लावड. दुर्योधन केंगार. विजय ढेबरे. अंगुली बनसोडे. सगळ्यात महत्वाची भूमिका शरद नाळे यांनी पूर्णपणे समस्या निराकारण केले.

            सामाजिक भान ठेवून माजी नगराध्यक्ष नितीन शेठ दोशी, बंडू धट, माजी नगरसेवक अकील काझी. . संजय सोनवणे सुरेश म्हेत्रे. आकाश पिसे. आकाश मेंढापुरे. अविनाश चव्हाण. यांनी जनजागृती करून शिबीर यशस्वी करण्या साठी प्रयत्न केले 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!