श्रीवर्धन उपविभागीय तथा प्रांताधिकारी डॉ.दिपा भोसले यांच्या कडे अतिरिक्त असलेला कारभार नव्याने भंडारा येथे निवडणूक उपजिल्हाधिकारी असलेले महेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.नुकताच त्यांनी श्रीवर्धन उपविभागीय अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला आहे.
महेश पाटील हे मुळचे सांगली जिल्ह्यातील वाळवा येथील आसून त्यांना महसूल खात्यातील विविध पदांवर काम केल्याचा दांडगा अनुभव आहे.त्यांनी आतापर्यंत रत्नागिरी,गुहागर-आरोस येथे नायब तहसिलदार पदी, कुडाळ-माण,सोलापुर येथे तहसिलदार पदी,पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवडणूक विभाग,गडचिरोली व रत्नागिरी येथे जिल्हा पुरवठा अधिकारी पदी,भंडारा येथे उप जिल्हाधिकारी(निवडणूक)या पदावर काम केले आहे. येणाऱ्या लोकसभा,विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नव्याने त्यांना श्रीवर्धन येथील उपविभागीय अधिकारी पदाचा कार्यभार देण्यात आला आहे.