.नवनाथ सुखदेव बिडगर रा. भाटकी(गाडेकरवस्ती) ता. माण येथील रहिवाशी असून बालपनापासूनच दोन्ही पायाने दिव्यांग असून खेळाची आवड असल्याने त्यांनी राष्ट्रीय-राज्य स्तरावर अनेक सुवर्ण, रौप्य,व कास्य पदके मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली असून जिल्हा स्तरावर त्याची दाखल घेत त्यांना प्रजासत्ताक दिनी ‘क्रीडा क्षेत्रातील मानाचा’ *”गुणवंत खेळाडू दिव्यांग पुरस्कारने* पालकमंत्री मा. ना श्री. शंभूराजे देसाई, जिल्हाधिकारी व जिल्हा क्रीडाधिकारी यांच्या तर्फे सन्मानित करण्यात आले.
दिव्यांगावर मात करत त्यांनी *बी.फार्मसी* शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, कराड येथे ग्रॅज्युएशन पूर्ण केलं तसेच *M.A(लोकप्रशासन)* पोस्ट ग्रॅज्युएशन केले. सध्या डाक विभागात मुंबई येथे कार्यरत असून सुद्धा त्यांनी खेळाची आवड जपली आहे. त्यांना *ऑलिम्पिकवीर स्व.खशाबा जाधव जयंतीनिमित्त “राष्ट्रीय खेळाडू सन्मान”2023* ने गौरविले आहे.*”गुणवंत खेळाडू पुरस्कार” 2022-23 सातारा नगरपालिकातर्फे सन्मानित.**”गुणवंत खेळाडू पुरस्कार-2023″ सातारा समाज कल्याण विभागातर्फे सन्मानित केले.*
यासाठी त्यांना पॅराअथलेटिक असोसिएशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष-नंदकुमार नाळे सर* पॅराअथलेटिक असो.राज्य समन्वयक व मार्गदर्शक श्री. राजेंद्र पवार सर,जिल्हाअध्यक्ष-विक्रम शेंडगे सर, शेख सर, शिर्के सर यांचे मार्गदर्शन, सहकार्य लाभले.