कुकुडवाड येथील लोकमंगल सामाजिक सेवाभावी संस्था व आयुष मेडिकल्स यांचे संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनानिमित्त पंचक्रोशीतील पशुपालकांसाठी मदतीचा हात म्हणून सर्व प्रकारच्या जनावरांच्या औषधीचे आज मोफत वाटप करण्यात आले.
यावेळी श्री.चिन्मय कुलकर्णी भाजप युवा मोर्चा सातारा जिल्हा अध्यक्ष यांनी सांगितले की शेतकऱ्यांना अतिशय फायद्यासाठी उपक्रम असून जनावर व त्यांचं आरोग्य चांगलं रहावं यासाठी ही सामाजिक सौस्था काम करीत आहे, त्यांना शुभेच्छा देतो, सौस्थेचे सौस्थापक वैभव कुंभार यांनी सांगितले की शेतकऱ्यांना चांगलं मार्गदर्शन करणं व त्यांच्या जनावराचे आरोग्य चांगले ठेवून दूध उत्पादन वाढविण्यासाठी हा उपक्रम आहे. कोविड काळात सुद्धा आमच्या सौस्थेने गरजू रुग्णांना, औषध वाटप करून अनेक रुग्णांना बरं केलं व जीव वाचवला आहे. हे काम अविरत सुरु राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास कुकूडवाड गावचे सरपंच संजय जाधव, माजी सरपंच बाळासाहेब काटकर .ग्रामविकास अधिकारी देवकर तलाठी दिपक आचार्य तसेच डॉ गजानन जाधव,डॉ किरण कुंभार, संस्थेचे खजिनदार डॉ. उषा कुंभार. सचिव शुभांगी कुंभार. डॉ सचिन वाघमारे, डॉ बिराजी कारंडे, डॉ ऋतुराज राजेघाटगे, नैसर्गिक शेतीतज्ञ भास्कर शेठ देशमुख, ग्रामपंचायत सदस्य मनोज काटकर, सुधाकर काटकर, श्रीमंत काटकर व सर्व पशुपालक शेतकरी बांधव उपस्थित होते.