तळा तालुक्यातील मौजे बोरघर हवेली येथे असलेल्या ज्ञानदीप माध्यमिक विद्यामंदिर शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या शुभ हस्ते उत्साही वातावरणात संपन्न झाले.
ज्ञानदीप माध्यमिक विद्यामंदिर बोरघर हवेली या शाळेचे मागील निसर्ग चक्रीवादळात मोठे नुकसान होऊन शाळा इमारतीची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती अशा वेळी शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायचे कोठे असा प्रश्न येथील संस्थाचालक व शिक्षक वर्गाला पडला असताना त्यांनी सामाजिक कार्यकर्ते,रायगड भूषण कृष्णा महाडिक यांच्याशी संपर्क साधला असता समाजसेवक कृष्णा महाडिक यांनी क्षणाचाही विचार न करता मुंबईतील प्रसिद्ध उद्योजक मंदार शर्मा यांच्या आर्थिक सहकार्याने शाळेची नवीन सुसज्य इमारतीचे बांधकाम पूर्ण करून तीचे उद्घाटन सोहळा रायगड पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी उद्योजक मंदार शर्मा,समाजसेवक कृष्णा महाडीक, रायगड जिल्ह्याच्या माध्यमिक विभागाच्या उपशिक्षणाधिकारी सुनिता पालकर,संस्थेचे अध्यक्ष दिपक रसाळ,चेअरमन यशवंत मोंढे,सचिव मनोहर काप,रामदास मोरे, मुख्याध्यापिका किरण चव्हाण आणि संस्थेचे पदाधिकारी,शिक्षक कर्मचारी वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.